अवनखेड येथे मंगळवारी बैठकीसाठी संचालक मंडळ आले असता तेथील सरपंच नरेंद्र जाधव व काही ऊस उत्पादक सभासदांनी ऊसतोड वेळेवर होत नाही, बाहेरील ऊस अगोदर आणला जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होते आदी मुद्द्यांवर बैठक घेण्यास विरोध केला. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कादवा कार्यस्थळावर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेटसमोर सभा घेत निषेध केला. दरम्यान, चेअरमन श्रीराम शेटे यांनी यावेळी सभासदांची भेट घेत शांतता ठेवण्याचे आवाहन केले. विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्यांना इथेनॉल प्रकल्प उभा राहणे व सभासदांच्या ठेवी देणे बघवत नसल्याने राजकीय विरोधासाठी हा विरोध होत असून त्याला जास्त महत्त्व देऊ नका, असेही शेटे यांनी सांगितले.
याप्रसंगी वणी खुर्दचे राजाराम ढगे, बाळासाहेब जाधव, विश्वनाथ देशमुख, साहेबराव पाटील, वलखेडचे दिलीपराव शिंदे, अवनखेडचे प्रकाश पिंगळे, पालखेड बंधाराचे काका गायकवाड, हातनोरे येथील सुरेश बोरस्ते, दिंडोरीचे नरेश देशमुख, निळवंडीचे सोमनाथ पाटील, मातेरेवाडीचे दिनकर गटकळ, चिंचखेड येथील रावसाहेब पाटील, उमराळे खुर्दचे श्याम हिरे,जोपुळचे डॉ. योगेश गोसावी, दहेगावचे अजित कड आदी सभासद ऊस उत्पादक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्षेत्रातील विविध गावांचे सभासद ऊस उत्पादक उपस्थित होते.