नाशिक : भारतीय हवामान खात्याने येत्या ४८ तासांत म्हणजेच रविवार व सोमवार या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागातील सर्वच जिल्'ांमध्ये पाऊस होणार असून, त्यापासून खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी गारपीट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे, दुभती व इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, कापणी झालेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, गारपिटीनंतर तपमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी. गारपीट सुरू असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दोन दिवस पावसाची शक्यता
By admin | Updated: March 8, 2015 00:49 IST