शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

येवल्यात पतंगोत्सवाची तयारी

By admin | Updated: January 11, 2017 22:34 IST

येवल्यात पतंगोत्सवाची तयारी

येवला : संक्र ांत म्हटली की येवल्यात एक नवा उत्साह संचारतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जवळपासच्या सर्व राज्यांत येवला पतंग उडविणे व त्याची मजा लुटण्याच्या बाबतीत सुप्रसिद्ध आहे. गुलाबी थंडी, थंड वाहणारे वारे अशा आल्हाददायक वातावरणात आलेली संक्र ांत साजरी केली जाते. उत्सवप्रेमी येवला शहरात मकरसंक्र ांतीच्या पतंगोत्सवाकडे आबालवृद्ध यांचे डोळे लागलेले असतात. मकरसंक्र ांत यंदा शनिवारी (दि. १४) आहे. संक्र ांतीआधीचा भोगीचा दिवस शुक्र वार व त्यानंतरचा करीचा रविवारचा असे एकूण तीन दिवस येवला शहरातील सर्वच व्यवसाय ठप्प होतात. तीनही दिवस घरांच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी होते. पतंग काटली तर मोठ्याने होणारा गलबला, ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव.. बढाव..चा होणारा सामूहिक जल्लोष, येवल्याच्या सुप्रसिद्ध हलकडी, बॅँडचा आवाज यामुळे सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरण असते. पतंग केवळ लहान मुले, युवक वा मध्यमवयीनच उडवीत नाहीत, तर महिलाही मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात.निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहानमोठ्या आकाराच्या पतंगांचे मोहक दृश्य यावेळी दिसते. येवला शहरात मकरसंक्र ांतीच्या सहा महिने आधीपासूनच खास खासियत असलेले वैशिष्ट्यपूर्ण पतंग बनविणे, पतंग उडविण्यासाठी लागणारी लाजवाब आसारी तयार करणे यासाठी बुरु ड कुटुंबीयांचा कुटिरोद्योग जोमाने सुरू असतो. याशिवाय पतंग उडविण्यासाठी आवश्यक मांजादेखील तयार केला जातो. सुरत, बरेली, अहमदाबाद, मुंबई या ठिकाणच्या पतंगांपेक्षा येवल्याचा पतंग अगदी वेगळा असतो. येथील कै. अण्णा गवते यांचा अण्णाचा ढोल, कै. बाबूराव पटेल यांच्यासह अनेकांचे पतंग प्रसिद्ध होते. पतंग तयार करण्यासाठी सफेद रंगाची जर्मन फडकी, मार्बल फडकी, नॉर्वेची फडकी वापरली जातात. जून महिन्यापासून पतंग तयार करण्यास सुरु वात होते. शहरातील ३० ते ४० कुटुंबांतील सर्वच माणसे पतंग बनविण्यात निष्णात आहेत. या हंगामी व्यवसायावर त्यांची उपजीविका चालते. पतंग तयार करण्यासाठी लागणारी कमान दट्ट्या हल्ली तयार स्वरूपात मुंबई व कोलकाता येथून आणला जातो. परंतु हाताने तयार केलेल्या कमान दट्ट्याची पतंग उडविण्यात मजा काही औरच असते. अशा पतंगाला ताव भरपूर असतो. अशा पतंगाचे प्रकार तसे अनेक आहेत. डुग्गी, तीनचा, अर्धीच, पाऊणचा, सव्वाचा असे प्रकार आहेत. दरवर्षी धडपड मंच, खटपट मंच, जय बजरंग फ्रेंड्स सर्कल, मधली गल्ली येथे फडकणारे १२ फडकीचे आकर्षक पतंग दिमाखाने फडकत नववर्षासह मकरसंक्र ांतीच्या शुभेच्छा शहरवासीयांना देत असतात.पतंगांची नावे मोठी गमतीदार आहेत. अंडेदार, गोंडेदार, कल्लेदार, मछीदार, पट्टेदार अशी अनेक नावे आहेत. अंडेदार पतंगाला नाशिकमध्ये धोबी पतंग म्हणतात. याची गोष्ट अशी की पूर्वी नाशिकमध्ये धोबी समाजाचे एक गृहस्थ येवल्याहून हे अंडेदार पतंग विक्र ीसाठी नेत असत. तेव्हापासून या पतंगाला नाशिकमध्ये धोबी पतंग म्हणतात. झब्बू, समोसा याशिवाय पीव्हीसी मटेरिअलचे अहमदाबादहून आलेले पतंग बंबईदार पतंगशौकीन आवर्जून खरेदी करतात. या पतंगांच्या काटकाटीत खालून वर खेचण्यासाठी होतो. सर्वसाधारणपणे येवला शहरात सुमारे तीन लाख पतंग बनविले जातात. याची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. (वार्ताहर)