शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘सावाना’साठी आज मतदान; यंत्रणेची तयारी

By admin | Updated: April 2, 2017 02:02 IST

नाशिक : १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी रविवारी (दि.२) मतदान होत आहे.

नाशिक : १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी रविवारी (दि.२) मतदान होत असून, गेल्या एक महिन्यापासून उडालेला प्रचाराचा धुराळा आता संपणार आहे. या निवडणुकीत वार्षिक आणि आजीवन असे ३५८० सभासद मतदार आहेत.सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष पदासाठी एक, उपाध्यक्षपदासाठी दोन, तर कार्यकारिणी मंडळ सदस्यांसाठी १५ अशा एकूण १८ उमेदवारांना मतदान करणे आवश्यक आहे. या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनल, जनस्थान पॅनल आणि परिवर्तन पॅनल या तीन प्रमुख पॅनलसह अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी पूर्ण १८ उमेदवारांसह निवडणूक रिंगणात उतरून ग्रंथमित्र पॅनलने विरोधकांना तगडे आव्हान निर्माण केले आहे. तर जनस्थान पॅनलने १६ उमेदवार रिंगणात उतरवत विरोधकांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला आहे. जनस्थान पॅनल अध्यक्षांशिवाय आणि दोन उपाध्यक्षांपैकी एक उपाध्यक्षा शिवाय मतदान रिंगणात उतरल्याने यंदाच्या निवडणुकीत रंगतदार लढती होणार असल्याचे संकेत दिले आहे. या निडवणुकीत तिसऱ्या परिवर्तन पॅनलमध्ये केवळ पाच उमेदवार असून, प्रभाकर कुलकर्णी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा एक आणि कार्यकारिणी मंडळ सदस्य अशा तीनही जागांवर आपली उमेदवारी निश्चित केल्याने निवडणूक निकालानंतर प्रभाकर कुलकर्णी काय भूमिका घेतात, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.अपक्ष उमेदवारांमध्ये रमेश जुन्नरे यांनी उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी मंडळ सदस्य अशा दोन्ही ठिकाणी आपली उमेदवारी निश्चित केली आहे. यंदाच्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच जवळपास १५० हून अधिक अर्जांची विक्री झाल्याने तसेच या निवडणुकीत साहित्यिकांसह राजकारणी, बांधकाम व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उडी घेतल्याने सगळ्यांनीच भुवया उंचावल्या आहेत.ग्रंथमित्र पॅनलमध्ये विलास औरंगाबादकर (अध्यक्ष), किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते (उपाध्यक्ष) तर कार्यकारिणी मंडळ सदस्यांमध्ये संजय करंजकर, वसंत खैरनार, जयप्रकाश जातेगावकर, देवदत्त जोशी, वेदश्री थिगळे, गिरीश नातू, अ‍ॅड अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, संगीता बाफणा, श्रीकांत बेणी, धर्माजी बोडके, शंकर बोऱ्हाडे, उदयकुमार मुंगी, भालचंद्र वाघ आणि भानुदास शौचे; जनस्थान पॅनलमध्ये अरुण नेवासकर (उपाध्यक्ष) तर कार्यकारिणी मंडळ सदस्यांमध्ये मोहन उपासनी, सुरेश गायधनी, शामला चव्हाण, राजेश जुन्नरे, धनंजय बेळे, सतीश महाजन, सुनेत्रा महाजन, नंदन रहाणे, विनोद राठोड, हंसराज वडघुले, अमित शिंगणे, समीर शेटे, मकरंद सुखात्मे, चैत्रा हुदलीकर आणि मंदार क्षेमकल्याणी, परिवर्तन पॅनलमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रभाकर कुलकर्णी, तर कार्यकारिण मंडळ सदस्यांमध्ये दीपक कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, शशांक मदाने, हेमंत राऊत आणि कृष्णा शहाणे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे कांतीलाल कोठारी आणि रमेश जुन्नरे उपाध्यक्षपदासाठी तर कार्यकारिणी मंडळ सदस्य म्हणून रमेश जुन्नरे, पद्माकर इंगळे, शरदचंद्र दाते, संजय येवलेकर आपले नशीब आजमावत आहेत.निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सावाना विविध मुद्द्यांनी नेहमीच चर्चेत राहिले. स्वराज्य संस्थांप्रमाणेच सावानाची निडवणूक रंग घेऊ लागल्याने ही निवडणूक सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. पत्रकबाजी, फलकबाजी यांसह सोशल माध्यमांवर होणाऱ्या प्रचार तसेच साहित्यक्षेत्राशी संबंधित ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत पॅनलतर्फे जेवणावळीही उठल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. दरम्यान, अर्ज दाखल करतेवेळी आणि अर्ज माघारीवेळी घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीही चर्चेचा विषय ठरल्या होत्या. तीन पॅनलमध्ये प्रामुख्याने होण्याऱ्या या लढतीत विविध आश्वासनांची खैरात करण्यात आली असली तरी ‘न्यायालय मुक्त’ सावाना व्हावे हा प्रचाराचा मुद्दा मात्र सगळ्याच पॅनलच्या जाहीरनाम्यातून स्पष्टपणे अधोरेखित झाला असला तरी वाचक सभासद कोणाच्या हाती सावानाच्या चाव्या सुपूर्द करतात यासाठी सोमवारी (दि. ३) जाहीर होणाऱ्या निकालाची वाट पहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)