नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही पॅनलच्या नेत्यांना मात्र वेगळीच चिंता सतावत असून, या चिंतेने त्यांना निवडणुकीआधीच पराभूत केल्याचे चित्र आहे.एका पॅनलच्या नेत्यांनी तर याच कारणाने सहकार कायद्यांचा अभ्यास सुरू केला आहे. जिल्हा बॅँकेवर गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून प्रशासक मंडळ असून, जिल्हा बॅँकेचा एन.पी.ए. चक्क १९ टक्क्यांच्या वर पोहोचल्याचे समजते. आता एप्रिल-मेमध्ये निवडणूक होऊन संचालक मंडळ स्थिरावते न स्थिरावते तोच, जर हाच एन.पी.ए. २० टक्क्यांच्या पुढे पोहोचल्यास नाबार्ड किंवा रिझर्व्ह बॅँकेकडून कधीही बॅँकेवर पुन्हा प्रशासन नियुक्ती करण्याची टांगती तलवार येण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच तीन-चार महिन्यांसाठीच संचालक मंडळाला कारभार करण्याची संधी मिळणार असेल तर मग का म्हणून निवडणूक लढवायची तरी कशाला? असा प्रश्न जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांना पडला आहे. सध्या अवकाळी पावसामुळे व मागील गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या खरीब व रब्बीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना घेतलेले दीर्घ व मध्यम मुदतीचे कर्ज भरणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळेच जर यावर्षी कर्जाची वसुली जरी थकली तरी एन.पी.ए. वाढण्याची भीती आहे. जिल्हा बॅँकेची निवडणुकीआधीच राजकारण्यांची उडाली ‘दांडी’
निवडणुकीआधीच राजकारण्यांची उडाली ‘दांडी’
By admin | Updated: March 8, 2015 00:42 IST