लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड पुलावरील पडलेले खड्डे अपघाताला नियंत्रण देत असल्याने येथे कोणत्याही वेळेला मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्टात प्रसिद्ध असणारा अवनखेडचा जुना पूल हा सध्या खड्ड्याच्या आजारपणाने त्रस्त झाला असून, येथून प्रवास करताना वाहनधारकांला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या जुन्या पुलावर ऐन मध्यभागी मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी अपघात होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.पुलाच्या दोन्ही बाजूने उतार असल्याने वाहने वेगाने येतात. परंतु हे खड्डे वाहनधारकाला जवळ आले तरी दिसत नाही. त्यामुळे मोठी वाहने, दुचाकी या खड्ड्यात आदळतात. त्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारक याठिकाणी आदळून पडल्यामुळे जखमी झाले आहेत व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक घटना आहेत.या रस्त्याची मध्यंतरी डागडुजी करण्यात आली. परंतु खड्डे तसेच राहिल्याने प्रवासीवर्गाची डोकेदुखी अजून वाढली आहे. या कादवा नदीला बाराही महिने मोठ्या प्रमाणावर पाणी असते. त्यामुळे जर हे खड्डे बुजविले नाही तर एक प्रकारे मोठ्या अपघाताला आमंत्रण दिल्या सारखेच होईल.या जुन्या पुलाजवळ मोठा नवीन पूल वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. परंतु बहुतेक वाहनधारक वणीकडून येताना नवीन पुलावरून जातात. व दिंडोरीकडून येणारी सर्व वाहने ही जुन्या पुलावरून जातात. जर नवीन पूल वाहतुकीसाठी उपलब्ध असताना जुन्या पुलावरून वाहतूक का , असा प्रश्न आहे. साधारणपणे दुचाकी वाहनांनी या पुलावरून वाहतूक केली तर योग्य होईल व अवजड वाहनांचीही नवीन पुलावरून वाहतूक करावी, जेणेकरून अपघाताला आळा बसेल.
अवनखेड पुलावरील खड्डे देतायेत अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:17 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड पुलावरील पडलेले खड्डे अपघाताला नियंत्रण देत असल्याने येथे कोणत्याही वेळेला मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवनखेड पुलावरील खड्डे देतायेत अपघाताला आमंत्रण
ठळक मुद्देखड्डे तसेच राहिल्याने प्रवासीवर्गाची डोकेदुखी अजून वाढली