शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

बॅग ‘कॅरी’ करणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:42 IST

नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक : नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेतून साडेतीनशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.शासनाच्या या निर्णयामुळे अनेक व्यापारी, विक्रेत्यांचे हाल झाले. कपडे, बॅग आणि अन्य साहित्य प्लॅस्टिकच्या आवरणातून काढावे लागल्याने हा माल खराब झाला. तर दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्लॅस्टिक बंदीविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केल्याने व्यापाºयांनी दीड तास लिलाव बंद ठेवले. नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविण्यात येतो. त्यामुळे माल पाठवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस खोक्यांमध्ये भाज्या पाठविण्यात आल्या.  राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्यात प्लॅस्टिक व्यापाºयांवर कारवाई न करता अन्य व्यापारी आणि दुकानदारांवर ती करण्यात आली होती; मात्र शनिवारपासून (दि. २३) महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकारामुळे नाशिकच्या बाजारपेठेत संभ्रम आणि कारवाईचे सावट होते. कापड दुकान, बॅगा आणि तत्सम साहित्य धुळीपासून वाचविण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्यात येतात; परंतु त्यांना प्लॅस्टिकचे आवरण काढून ठेवावे लागले, त्यामुळे अनेकांच्या वस्तूंवर धूळ बसली तर रस्त्यावर माल विकणाºयांची पावसामुळे अडचण झाली.दिवसभर बाजारात कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरता येईल याविषयी खल सुरू होता. अनेकांनी जुन्या कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. अशा स्थितीत महापालिकेने कारवाईचा दणका सुरू केला आणि चौथा शनिवार हा सुटीचा दिवस असतानादेखील कारवाई करण्यात आली. महापालिकेने सहा विभागात सहा पथके कारवाईसाठी नियुक्त केली होती. बाजारपेठा, व्यावसायिक संकुले अशा विविध भागात कर्मचाºयांनी कारवाईचा धडाका लावला.नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावापूर्व विभागात १४ वापरकर्त्यांकडून ७० हजार रुपये, पश्चिम विभागात १५ जणांकडून ७५ हजार, नाशिकरोड विभागात १२ जणांकडून ६० हजार, पंचवटी विभागातून १६ जणांकडून ८० हजार, सातपूर विभागात पाच जणांकडून २५ हजार, सिडको विभागात १० जणांकडून ५० हजार याप्रमाणे ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपये असा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी