मालेगाव : रमजान महिन्याच्या कालावधीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून (दि.७) प्रायोगिक तत्त्वावर काही भागांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.गेल्या काही महिन्यापासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. रमजान महिन्याच्या कालावधीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल व सर्वपक्षीय नेत्यांनी महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन केली होती.दरम्यान मंगळवारपासून ५ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ, कॅम्प जलकुंभ, निहालनगर जलकुंभ, आझादनगर जलकुंभ, साठ एचपीअंतर्गत येणारे झोन, संगमेश्वर जलकुंभ, रजापुरा, सर सय्यद जलकुंभ या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर बुधवारपासून रविवार वॉर्ड, आझादनगर, कॅम्प, निहालनगर, संगमेश्वर, सोयगाव, गुलाब पार्क, म्हाळदे घरकुल आदि भागात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.
मालेगावी आजपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:54 IST
मालेगाव : रमजान महिन्याच्या कालावधीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून (दि.७) प्रायोगिक तत्त्वावर काही भागांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मालेगावी आजपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
ठळक मुद्देपाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले