शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदू धर्म नव्हे; भाजपचे नेते, पक्ष खतरेमें; संजय राऊतांचा टोला

By suyog.joshi | Updated: June 3, 2023 16:28 IST

त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात केली आरती

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : हिंदू धर्म खतरेमें असा होणारा प्रचार निखालस खोटा आहे. हिंदू धर्म नव्हे तर त्यांचेच नेते व पक्ष खतरेमें असल्याचा टोला ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. त्र्यंबकेश्वर येथे काही लोकांनी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु, शांतताप्रिय गावकऱ्यांनीच त्यांचा डाव हाणून पाडला. एसआयटी नेमण्याइतपत एवढे वातावरण नव्हते, असेही राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे मंदिराला भेट दिल्यानंतर माध्यमांसमोर सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. ३) त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन अभिषेक व पूजा-आरती केली. पूजेचे पौराेहित्य सचिन दीक्षित व सहकाऱ्यांनी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, पक्ष अडचणीत आला की धार्मिक तणाव निर्माण करणे, धार्मिक वाद निर्माण करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आदी प्रकारचा अवलंब केला जातो. प्रत्येक गावाच्या प्रथा-परंपरा असतात. संदल मिरवणूक जात असताना धूप दाखविण्याच्या प्रकारावर वाद झाला; परंतु, त्यावेळी मंदिर बंदच होते. पायरीवरून धूप दाखवला गेला. त्याने काय हिंदू धर्म भ्रष्ट झाला? हिंदू धर्म इतका कमजोर आहे की कमकुवत आहे? कुणीही येतो आणि आम्हाला हिंदू धर्म शिकवतो. हिंदू धर्म समजण्यासाठी अगोदर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे वाचा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ती पुनर्जिवीत करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यासाठी लढा देणाऱ्या ललिता शिंदे यांना साथ द्यायला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गिते, विनायक पांडे, निर्मलाताई गावित, इगतपुरीचे निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख संपत चव्हाण, मनोहर मेढेपाटील, निवृत्ती लांबे, सचिन दीक्षित, कल्पेश कदम, नंदकुमार कदम, नितीन पवार, दीपक लोखंडे, पिंटू काळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.सय्यद यांच्याशी गळाभेट

खासदार संजय राऊत यांची गुलाबशहावली बाबा दर्गाचे सलीम सय्यद यांनीही भेट घेतली. यावेळी राऊत यांनी सय्यद यांची माध्यमांसमोरच गळाभेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, डाॅ. आंबेडकर चौकात ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनेही सन्मान करण्यात आला.