नाशिक : येथील विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्र तसेच भारत-युरोप मंडळाचे सदस्य व शिवालय नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा विकास प्रकल्पात यशस्वी सहभाग घेतला. कोरोनामुळे सध्या हा प्रकल्प ऑनलाइन राबविण्यात आला. त्यात नाशिकच्या श्वेता मगरे-पांडे, सरिता कोरोळे-आंग्रे, ऐश्वर्या पवार आणि संदीप पांडे यांनी विशेष नैपुण्याने बाजी मारली.
भारताचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी नाशिकच्या विश्व शैक्षणिक-सांस्कृतीक केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. दीपक मगरे यांच्या
नेतृत्वाखाली विविध देशातील युवकांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व एकात्मतेसाठी सद्यस्थितीतील महत्वपूर्ण प्रश्नांवर युवकांना जागृत करुन त्यांना सक्षम नागरीक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध विषयांचे शिक्षण झालेल्या, भाषा व कला कौशल्य असलेल्या अभ्यासू युवकांची निवड करण्यात आली. युरोप खंडातील फ्रान्स व पोलंड, अफ्रिकेतील ट्युनिशिआ, मोरक्को,आयवरीकोस्ट व आशियातील भारत देशातील युवक-युवतींची निवड करण्यात आली होती. नाशिकच्या या चार युवांनी त्यांच्या वाकचातुर्याने विशेष छाप पाडली. या विशेष चर्चासत्र आणि कार्यशाळांचे ऑनलाईन आयोजन नुकतेच करण्यात आले.शेवटच्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सांस्कृतीक संध्या’ या कार्यक्रमाच्या आयोजनाने समारोप करण्यात आला.फ्रान्सच्या आमसेद इंटरनॅशनलच्या मादाम माथील्ड ज्युंग आणि मादाम लिडीया क्लिशु, पोलंडच्या इ.एस.डी. संस्थेचे प्रा.डॉ.पॉवेल टॅम्पझीक,ट्युनेशीयाच्या आवेक इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रा. राशीद जानेन, मोरोक्कोच्या चिल्ड्रन ॲन्ड युथ ट्रस्ट च्या अध्यक्षा प्रा. नादीन बेन्ज नाशिकच्या संस्थांचे अध्यक्ष प्रा.दीपक मगरे यांनी या सहा देशातील युवा प्रतिनिधीना मार्गदर्शन केले.
इन्फो
सहा देशातील युवांचा सहभाग
या प्रकल्पात ‘आंतरराष्ट्रीय नागरीकता आणि सहजीवन’, ‘कोविड विषाणू महामारीचे आव्हान’, ‘शाश्वत विकासाची ध्येय’, ‘आंतरराष्ट्रीय
एकात्मता आणि युवा सहभाग’, ‘आंतरसांस्कृंतिक मुल्यांचे महत्व’ आदी विषयांचा समावेश होता. या विषयांवर निवडलेल्या युरोपीय, अफ्रिकन व भारतीय युवा प्रतिनिधींनी हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि अरेबीयन आदी भाषातील संभाषण कौशल्य व वरील विषयाच्या ज्ञानाआधारे हिरीरीने सहभाग नोंदवला.
फोटो
२०डान्सर