नाशिक : अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, त्यासाठी संस्था नियुक्त करण्यासाठी तीस लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.नाशिक ते मुंबई हा मार्ग चौपदरीकरणामुळे सुलभ झाला आहे. तसेच रेल्वेमार्गही उपलब्ध आहे. मात्र नाशिक-पुणे हा पाच ते सहा तासांचा प्रवास नागरिकांच्या दृष्टीने कंटाळवाणा आणि त्रस्त करणारा ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी देशात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असताना नाशिक ते पुणे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी आर्थिकदृष्ट्या हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा मार्ग किफायतशीर असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा पुन्हा सर्व्हे
By admin | Updated: January 13, 2016 00:10 IST