नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:08 AM2019-10-24T08:08:01+5:302019-10-24T08:09:19+5:30

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती.

Nashik Election Results: Devani Farande, Seema Hire or apurv hire to Become Mla | नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

googlenewsNext

नाशिक : गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच शहरातील मतदारांनी कौल दिला; मात्र यंदा परिस्थिती वेगळी झाल्याने जनतेचा कौल कोणाला मिळणार याचा फैसला गुरु वारी होणार आहे. २०१४च्या विधानसभेत निवडणूकीत विजयाची माळ गळ्यात पडलेल्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप हे तीनही आमदार यंदा पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. तसेच पक्षांतर करणारे बाळासाहेब सानप यांनी विधानसभेचा राजीनामा देत निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य आणि देवळाली अशा चारही मतदारसंघांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष  लागले आहे. 

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती. पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णय मतमोजणीनंतर समोर येणार आहे.


नाशिक शहरात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार मतदारसंघ असून, यंदा सर्वच मतदारसंघांत विशेष चुरस पहावयास मिळाली. २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य या तीन मतदारसंघांवर मनसेने प्रथमच झेंडा फडकावला होता. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्या नव्या पक्षाच्या भावनेवर नाशिककर स्वार झाले होते. २०१४मध्ये अशाच प्रकारे मोदी लाटेच्या भावनेवर स्वार होत तिन्ही
मतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार नाशिककर जनतेने निवडून दिले होते. यंदा भाजपा बरोबरच शेवटच्या टप्प्यात राष्टÑवादीनेदेखील जोरदार प्रयत्न केल्याने लाट की परिवर्तन हे मतदारांच्या कौलनंतर स्पष्ट होणार आहे.
नाशिक पूर्वमध्ये भाजपामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मनसेतून आलेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांना अचानक उमेदवारी देण्यात आली तर उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे शहराध्यक्ष व विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी मनगटावर थेट ‘घड्याळ’ बांधत कमळाचे उपरणे उतरवून ठेवले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. परंतु मतदान झाल्यानंतरदेखील कोणीच या मतदारसंघाविषयी खात्री देऊ शकत नाही, इतकी चुरस यंदा निर्माण झाली. नाशिक मध्यमध्ये भाजपाच्या उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी सहज मिळाली. मात्र कॉँग्रेस- राष्टÑवादी आणि मनसे असे उभय पक्षांचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले. त्यातच सर्वच पक्षात फाटाफूट झाली. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने मध्य नाशकात गेला असेल, याविषयीची उत्कं ठा अधिकच वाढली आहे. फरांदे यांना मनसेकडून माजी आमदार नितीन भोसले तर कॉँग्रेसकडून गटनेता हेमलता पाटील यांच्या विशेष आव्हानाला सामोरे जावे लागले.


नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा सर्वाधिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर मित्रपक्ष शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी बंड पुकारून थेट आव्हान दिले. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडेही नाशिकसह अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. शिवसेनेकडूनच बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना पुरस्कृत केले असल्याचे चित्र उभे राहिले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामा देऊन वापरलेल्या दबावतंत्रानंतर भाजपानेदेखील त्यांच्या भरवशावर न राहतास्वबळावरच या मतदारसंघात निवडणूक लढविली. तथापि, राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांचीच नव्हे तर सर्वच
उमेदवारांची दमछाक केली. त्यातच मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांच्या उमेदवारीनेदेखील या मतदारसंघात वेगळीच रंगत आणली. देवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांपैकी विद्यमान आमदार डॉ. योगेश घोलप यांना तीस वर्षांत प्रथमच तुल्यबळ आव्हान उभे करण्यात विरोधकांना यश मिळाले, असे सांगितले जाते. भाजपाच्या नगरसेविका असलेल्या डॉ. सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करताना घोलप यांची दमछाक बऱ्यापैकी केली.


मतदानाची टक्केवारी धाकधूक वाढविणारी..
नाशिक शहरात देवळाली मतदारसंघाचा अपवाद वगळला तर अन्य तीन मतदारसंघांत
२०१४च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात घसरली आहे. नाशिक
पूर्वमध्ये ५२.६८ मध्ये ५२.३८ टक्के इतके मतदान होते. यंंदा ते ५०.६६
टक्के इतके झाले. नाशिक पश्चिममध्ये २०१४ मध्ये ५१.७३ टक्के मतदान होेते.
यंदा ते ५४.३४ टक्के इतके झाले. नाशिक मध्य मतदारसंघात तर जिल्ह्यात
निच्चांकी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.७३ टक्के इतके
मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ४८.४० म्हणजे तीन टक्क्यांनी मतदान
कमी झाले आहे. घसरलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे गुरु वारी
निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nashik Election Results: Devani Farande, Seema Hire or apurv hire to Become Mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.