शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचा पाणीप्रश्न सुटला

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

नांदेड: मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसाने नद्या- नाल्या भरून वाहत आहेत़ या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे़ परभणी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने

नांदेड: मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसाने नद्या- नाल्या भरून वाहत आहेत़ या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे़ परभणी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने पाण्याचा येवा वाढला असून विष्णूपुरी प्रकल्पात दर तासाला ३ टक्के साठा जमा होत आहे़ त्यामुळे नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ ऐन पावसाळ्यात नांदेडकरांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिल्याने महापालिकेने आठवड्यातून एक वेळेस पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती़ त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ मात्र मघा नक्षत्राने अखेरच्या क्षणी साथ देवून हा प्रश्न सोडविला आहे़ पोळ्यापासून सुरू झालेल्या पावसाने गणेश चतुर्थीला जोरदार आगमन केले़ सलग सहा, सात दिवस झालेल्या पावसाने पिकांना जीवदान तर मिळालेच परंतु बहुतांशी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची साडेतीनशे मि़ मी़ च्या वर नोंद झाली आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात शनिवारपासूनच पाण्याचा येवा सुरू झाला होता़ ३० आॅगस्ट रोजी दुपारपर्यंत प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी जमा झाले होते़ त्यानंतर रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने वाढली़ सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात ६४़५८ दलघमी पाणी जमा झाले होते़ म्हणजेच प्रकल्प ८० टक्के पाण्याने भरला आहे़ प्रकल्पाची पाणीपातळी ३५३़९५ मीटरने वाढली आहे़ गोदावरी परिक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही तासात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे़ दर तासाला ३ टक्के पाण्याचा येवा सुरू आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प पूर्णपणे भरल्यास उद्यापर्यंत प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ नांदेड शहराचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात किती पाणीसाठा जमा झाले, याबाबत नांदेडकरांना उत्सुकता होती़ प्रकल्प दोन दिवसांत ८० टक्के भरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले़ (प्रतिनिधी)चार मोठ्या प्रकल्पांत ४१ टक्के साठानांदेड : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे चार मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१़२२ टक्के पाणीसाठा आहे़ त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आता दूर झाले आहे़पावसाळा संपत आला तरी, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते़ तर दुसरीकडे पिण्यासाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती़ विष्णूपुरी जलाशयात तर फक्त ८़७३ दलघमी एवढे पाणी शिल्लक होते़ त्यामुळे शहरावर आठ दिवसाआड पाण्याची टांगती तलवार होती़ त्यानंतर मात्र २६ आॅगस्टपासून जिल्ह्यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे़ त्यामुळे लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ सध्या इसापूर प्रकल्पात ४२९़६७७ दलघमी, लोअर मनार प्रकल्पात २९़७२१ दलघमी, अप्पर मनार प्रकल्पात २६़२३ दलघमी तर विष्णूपुरी प्रकल्पात ६४़५८ दलघमी एवढा पाणीसाठा आहे़ तर मध्यम प्रकल्पांमध्ये ५७़१६ दलघमी एवढे पाणी आहे़ त्यात आमदुरा प्रकल्प- २४़८३ दलघमी, दिग्रस-२१़८६ दलघमी, कारडखेड- ६़१३ दलघमी, कुंद्राळा- ३़३० दलघमी पाणी आहे़ तर बाभळी प्रकल्पात शून्य दलघमी पाणी आहे़ जिल्ह्यात ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरला पहाटेपर्यंत २५़६८ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट मात्र दूर झाले आहे़ (प्रतिनिधी)