Modi got reservation on the issue of reservation | संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना मिळाला कौल
संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना मिळाला कौल

देशाचे संरक्षण हा या निवडणुकीत कळीचा मुद्दा होता. या विषयावर मोदी यांच्यावर राजकारण झाल्याचा आरोप झाला खरा; परंतु लष्कराची सिद्धता आणि योग्य ठिकाणी दहशतवाद्यांवर केलेली कारवाई हाच मुद्दा खरेतर मतदारांना भावला आणि राष्टवादाच्या मुद्द्यावर अधिक मतदान झाल्याने मोदी सत्तासोपान चढू शकले.
लोकसभा निवडणुकीत देशाचे संरक्षण, पुलवामात शहीद झालेले जवान तसेच बालाकोटमधील कारवाई त्याचे मोदी राजकारण करीत असल्याचा आरोप चर्चेत होते. परंतु देशाच्या संरक्षण नीतीचा विचार करता लोकांना विरोधकांचे आरोप रूचले नाही, असे एकूण निकालावरून स्पष्ट होते. भारतीय शस्त्रसेनांचा विचार केला तर मोदींनी सैन्याला आधुनिक शस्त्रसज्ज करण्याकरिता पाचव्या पिढीतील शस्त्रसामग्री खरेदीतील दिरंगाई कंटाळवाणी प्रक्रिया टाळून, पारदर्शकतापूर्ण शस्त्र खरेदी अमलात आणली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत शस्त्रास्त्रे बनविण्यावर जोर दिला आहे. ज्यामुळे गेल्या दोन वर्षांत खासगी क्षेत्रातील महिंद्रा, टाटा यांसारख्या कंपन्यांनी संशोधनात गुंतवणूक करून बोफोर्सपेक्षा जास्त क्षमतेच्या आधुनिक तोफा व वाहने इत्यादी सैन्याला पुरविण्यास सुरुवात केली आहे. तसेच आवश्यक त्या क्षेत्रात मनुष्यबळ वाढवून, सैन्याचे नवीन युनिट्स उभ्या करण्यात आल्या आहेत. जसे पर्वतीय क्षेत्रात लढण्याकरिता खास माउंटन डिव्हीजन्स तार करून एकूणच सैन्याला सक्षम करणेकरिता आवश्यक ती सामग्री, लढाऊ विमाने, जहाजे, पाणबुड्या, रणगाडे, मिसाईल्स, रडार व खास सैन्य उपयोगी उपग्रह आदी देण्याचा सपाटा २०१५ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे एकूणच सैन्यदलाचा आत्मविश्वास वाढला आहे व आता पुढील पाच वर्ष सैन्यदल जगातील नंबर एकचे सामर्थ्यवान सैन्यदल म्हणून गणले जाईल.
संरक्षण सिद्धता व परराष्टÑनीती या एकाच राष्टÑहिताच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारताचे शेजारी असलेली नेपाळ, भूतान, श्रीलंका, ब्रह्मदेश, बांगलादेश ही मित्रराष्टÑे व पाकिस्तान आणि चीन ही शत्रू राष्टÑे याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली पाच वर्षे जी सामंजस्याची, दूरदृष्टीची परराष्टÑीय नीती, कूटनीती अमलात आणली त्याचे दृश्य परिणाम आपण गेल्या पाच वर्षांत सगळ्यांनी अनुभवले आहेत. या सगळ्या शेजारील राष्टÑांशिवाय जगातील महासत्ता अमेरिका, रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स व इस्त्राईल यांसारख्या देशांनी प्रस्थापित केलेले संबंध हे भारताला आपले २१व्या शतकातील जगाला दिशा दाखवणारी सांस्कृतिक महासत्ता, हे निश्चित करण्यात सहाय्यभूत होणार आहे. बहुमतांचे, सामर्थ्यवान नेतृत्वाचे सरकार केंद्रात दीर्घकाळ असोत हे आंतरराष्टÑीय संबंधाबाबत महत्त्वाचे असते. त्यामुळे विश्वासार्हता वाढते. यामुळे यापुढे भारताचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढत जाणार आहे.
भारतीय सशस्त्र सेनांच्या आजी-माजी सैनिकांचा विचार केला तर पंतप्रधान मोदींनी २०१४ ते २०१९ पर्यंत सैनिकांच्या अनेक प्रश्नांना जे गेले ५०-६० वर्षे दुर्लक्षित होते हात घालून ते मोठ्या प्रमाणावर समाधानकारक सोडवले आहेत आणि येत्या काही वर्षांत उतरलेल्या समस्या ते मार्गी लावतील, असा सैनिकाना विश्वास आहे. त्यामुळे आजी-माजी सैनिकांत पंतप्रधान मोदींना मिळालेल्या यशाबद्दल आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाबद्दल सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.
कॅप्टन अजित ओढेकर


Web Title:  Modi got reservation on the issue of reservation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.