नाशिक : चांदण्याची छाया कापराची कायामाउलीची माया होता माझा भीमराया....चोचीतला चारा देत होता साराआईचा उबारा देत होता साराभीमाईपरी चिल्यापिल्यावरीपंख पांघराया होता माझा भीमराया....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना, पक्षांच्या वतीने नाशिक शहर परिसरात अभिवादन करण्यात आले. शहरातील शिवाजी रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळा तसेच नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकासमोरील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी परिसरातील हजारो भीमबांधव मध्यरात्री एकत्र आले होते. पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, चेहेडी, एकलहरे, जेलरोड, दसक, पंचक आदि ठिकाणी प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास शनिवारी मध्यरात्री सार्वजनिक जयंतीउत्सव समितीतर्फे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष विलासराज गायकवाड, प्रभाग सभापती केशव पोरजे, नगरसेवक सुनील वाघ, हरिष भडांगे, कन्हैया साळवे, सुनील कांबळे, रिपाइं युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील, संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, प्रकाश पगारे आदि उपस्थित होते.