सतीश डोंगरे नाशिककाळाची गरज असलेले इंग्रजीचे ज्ञान गोरगरिबांच्या मुलांना अवगत व्हावे, या हेतूने पाइपलाइनरोड परिसरातील गुलमोहर कॉलनी जॉगिंग ट्रॅक येथे सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी साक्षरता उपक्रमास आता तरुणांनीही बळ दिले आहे. ‘लोकमत’मध्ये सदर उपक्रमाचे वृत्त वाचून प्रेरित झालेल्या या उच्चशिक्षित तरुणांनी गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. गुलमोहर कॉलनीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅक येथे रंजनी वर्मा या शिक्षकेने परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना मोफत इंग्रजी धडे देता यावे यासाठी उपक्रम सुरू केला होता. ज्यांना पैशाअभावी इंग्रजीच्या शिकवण्या लावणे शक्य नाही किंवा महापालिका तथा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी साक्षर करण्याची जणूकाही जिद्दच बांधली. केवळ विद्यार्थीच नव्हे तर सर्व वयोगटातील लोक त्यांच्या तासाला बसून इंग्रजीचे धडे घेत होते.
इंग्रजी साक्षरता उपक्रमाला जुळले अनेक हात
By admin | Updated: January 9, 2017 01:49 IST