शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गणपती बाप्पाला वाहतूक कोंडीतून वाचवू या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:15 IST

लोकमत इनिशिएटिव्ह नाशिक : सामान्य जनता सध्या ‘ट्रॅफिक जॅम’ने प्रचंड त्रस्त झालेली आहे. त्यातच होऊ घातलेल्या गणेशोत्सवात जर सार्वजनिक मंडळांनी ...

लोकमत इनिशिएटिव्हनाशिक : सामान्य जनता सध्या ‘ट्रॅफिक जॅम’ने प्रचंड त्रस्त झालेली आहे. त्यातच होऊ घातलेल्या गणेशोत्सवात जर सार्वजनिक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे रस्त्यात विस्तृत मंडप टाकले तर शहराच्या मध्यवर्ती भागातील संपूर्ण वाहतूकच कोलमडून पडू शकते आणि मंडपालाच वाहनांचा गराडा पडू शकतो. त्यामुळे लाडक्या गणरायाला आणि सर्वसामान्य जनतेला कोंडीतून वाचविण्यासाठी मंडपांचा आकार कमी करण्याबाबत काही पुढाकार घेतला घेण्याची गरज आहे.जनसामान्यांच्या याच अपेक्षा असून, उच्च न्यायालयाचे तेच आदेश आहेत. त्यामुळे आता सेवाभावी मंडळांनीच याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरात दरवर्षी श्रींचा उत्सव सर्वांच्या सहकार्यामुळेच निर्विघ्नपणे पार पडतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्सवामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. सर्वाधिक रहदारीचे रस्ते असतानाही त्यावर मोठ मोठे मंडप टाकले जातात. त्यावर देखावे सादर केले जातात. सामान्य नागरिकांनादेखील या मंडळांचे देखावे पाहण्यात नेहमीच रस असतो. त्यामुळे या गणेश मंडळांचे देखावे पहायला नागरिकांची नेहमीच प्रचंड गर्दी उसळत असते.उत्सवाचे अखेरचे पाच दिवस तर महानगरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तर प्रशासनाच्या देखील हाताबाहेर जाते. त्यात यंदाच्या वर्षी आधीच सामान्य जनता वाहतुकीच्या चक्रव्यूहाने मेटाकुटीस आली आहे. त्यात जर गणेशोत्सवाचे दहा दिवस आणि त्यापूर्वी मंडप उभारणीसहदेखावे उभारणीचे १० ते १२ दिवस या संपूर्ण काळात जर रस्ते प्रचंड आक्र सले गेले तर संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. त्यामुळे मोठ्या सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या वर्षी तरी हा वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त केली आहे.पूरग्रस्तांना मदत करा !पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे महापूराचे संकट ओढवले. नाशिककरांनाही पुराची झळ पोहोचली. त्यामुळे मंडपाचा आकार आणि उत्सवातील खर्चात काटकसर करून जरा पूरग्रस्तांना मदत केली, तर तेदेखील सकारात्मक पाऊल ठरेल.हेच ठरेल खरे सामाजिक कार्य !सार्वजनिक गणेश मंडळे ही नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. मग आपल्याच शहरात असलेले वाहतूक कोंडीचे संकट दूर करण्यासाठी या सार्वजनिक मंडळांनीच पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.मंडपाचा आकार कमी करून वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था करणे हे या सामाजिक कार्यातील पहिले पाऊल ठरू शकते. सार्वजनिक मंडळांनी तेच पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीTrafficवाहतूक कोंडी