शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

८८ केबलचालकांना अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:51 IST

नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे.

नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे.१ जुलैपासून देशात एक कर प्रणाली म्हणजेच जीएसटी लागू केल्यामुळे करमणूक कराची वसुली त्या त्या स्थानिक संस्थांकडे सोपविण्यात आली असली तरी, ३१ जून अखेरपर्यंतची वसुली करमणूक कर विभागाने करावयाची असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील २४४ केबलचालकांकडे जवळपास दीड कोटी रुपयांची थकबाकी होती. ती वसुलीसाठी त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या, त्यापैकी काही केबलचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आपल्याकडील थकबाकी शासन जमा केली.काही केबलचालकांनी या नोटिसांना दाद दिली नाही. अशा केबलचालकांचे प्रक्षेपण खंडित करण्याचे आदेश करमणूक कर विभागाने एमएसओंना दिले होते व त्यासाठी थकबाकीदार केबलचालकांची यादीही जोडली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात काही केबलचालकांनी एमएसओ बदलल्यामुळे असे केबलचालक शोधण्यात अडचणी निर्माणझाल्या.२४४ पैकी ८८ केबलचालकांनी अद्यापही करमणूक कर विभागाला प्रतिसाद दिला नाही, मात्र दीड कोटी रुपयांपैकी जवळपास एक कोटी रुपये आजवर वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे करमणूक कर विभागाने थकबाकीदार केबलचालकांना पुन्हा नोटिसा देऊन आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यांनी पैसे न भरल्यास त्यांचे बॅँक खाते सील करण्यात येणार आहे.