शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

कनाशी आठवडे बाजार ५० दिवसानंतरही पडला ओस

By admin | Updated: January 9, 2017 01:13 IST

नोटाबंदी : खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे ग्राहकांनी फिरविली पाठ

कळवण : शेतमालाला भाव नाही, आठवडे बाजारात भाजीपाला आणला तरी त्याला गिऱ्हाईक नाही, चार बाजार फिरलो तरी पैसा हातात नाही, शेतकऱ्याच्या हातात चलनच राहिलं न्हाई, तर तो बाजारात कसा येईल..? असा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारात येत आहे़ नोटाबंदीमुळे शेतकरी पुरा हैराण झाला आहे़कळवण तालुक्यातील कनाशी आठवडे बाजारात बेंदीपाड्याचे भिवराज बागुल, दळवटचे यशवंत पवार, जिरवाड्याचे मधुकर जाधव या आदिवासी शेतकऱ्यांनी व भाजीपाला विक्र ेत्या शामूबाई भोये, कापड विक्र ेते गिरीश मालपुरे, फळ विक्रेते उमेश सोनवणे यांनी आपली उघड नाराजी बोलून दाखविली. नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण अर्थकारण जैसे थे आहे. कनाशी आठवडे बाजारातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. नोटाबंदीनंतर ग्रामीण व आदिवासी परिसरात मंदीची लाट कायम आहे, शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण व आदिवासी भागामध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे .चलनटंचाईमुळे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक तर शेतमाल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आजही ग्रामीण व आदिवासी भागात कायम आहे. तर जे व्यापारी शेतमाल उचलण्यास तयार आहेत, ते दर पाडून शेतमालाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसून शेतमालाची विक्री करताना दिसून येतात .शेतमालाचा उत्पादन खर्च निघत नाही व निघत असला तरी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात भांडवल राहत नसल्याने पुढील हंगामात उत्पादन कसे घ्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. काळा पैसा शोधण्यासाठी मोदी सरकारने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे. नोटाबंदी झाल्यापासून एटीएम बंद तर बॅँकांमध्ये पैसा नाही. बँकेत होणाऱ्या गर्दीला वैतागून एटीएमकडे धाव घ्यावी, असे नागरिकांना वाटत होते. पण ते बंद असल्याने नागरिकांना बँकेत ताटकळत थांबावे लागते. राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅँक शाखेतून अल्पप्रमाणात पैसे मिळत आहेत. कधी बँकेकडे कॅश आलीच नाही तर नागरिकांना पैसे मिळत नाहीत. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या शाखेत नागरिकांचे पासबुक ठेवून घेतले जाऊन, दुसऱ्या दिवशी पैसे दिले जात आहे. ५० दिवसांपासून व नंतर कामधंदा सोडून केवळ पैशासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. कधी सुटणार हा काळ्या पैशाचा खेळ? असा सवाल नागरिक करत आहेत.बँकेत प्रत्यक्षदर्शनी महिलांची गर्दी दिसून आली. या गर्दीत अशिक्षित महिलांसमवेत सुशिक्षित महिलाही उभ्या असल्याच्या दिसून आल्या व त्यांच्यामध्ये पैसे खात्यावर जमा होणार असल्याची चर्चा होती.यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महिलांच्या जनधन खात्यात खरंच पैसे जमा होणार आहेत का ? अशी विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून अथवा मुख्य शाखेकडून तशी कसलीही माहिती मिळाली नसल्याने याबाबत आपण अनभिज्ञ आहोत; मात्र महिला मोठ्या प्रमाणात खाते उघडण्यासाठी आमच्या शाखेत येत आहेत. आम्ही त्यांचे जनधन खाते उघडत आहोत, अशी माहिती एका बॅँक अधिकाऱ्याने दिली.बँकेतून जुन्या नोटा बदलून देणे व स्वीकारणे बंद केल्यानंतर नागरिकांना खात्यातून अधिक नवीन चलन मिळणे अपेक्षित होते. मात्र, काही दिवसांपासून बँकांना नोटांचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने आठवड्याला २४ हजार रुपयेदेखील नागरिकांना खात्यातून काढता येत नाहीत. विविध बँका दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतच रकमेचा पुरवठा करीत असल्याचे चित्र कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात दिसून येत आहे.एक हजार व पाचश्ो रुपयांच्या नोटाबंदीनंतर दोन महिने उलटूनही पुरेशा नवीन चलनी नोटांचा पुरवठा करण्यात सरकारला अपयश आले असल्याचे चित्र आहे. आता केवळ आठवड्याला प्रत्येक खातेदाराला २४ हजार रु पये काढण्याची मुभा आहे.मात्र, बँकांना नवीन चलनाचा पुरवठाच होत नसल्याने केंद्र सरकारने ठरवून दिलेली २४ हजार रुपयांची मर्यादादेखील पाळणे शक्य होत नाही. बॅँकांना पैशांची मागणी करु नही पैसेच मिळालेले नाहीत व मिळत नाही त्यामुळे आठवड्याला २४ हजारांऐवजी ग्राहकांना केवळ दोन ते दहा हजार रुपयेच देता येत असल्याची माहिती एका बँकेच्या अधिकाऱ्याने दिली. बचत खात्यातून २४ व चालू खात्यातून ५० हजार रुपये काढण्यास परवानगी आहे; मात्र सध्या केवळ दोन ते दहा हजार रुपयांपर्यंतच ग्राहकांना रक्कम मिळत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमधून पुरेशी रक्कम मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी बँकेसमोर गोंधळ घालून राष्ट्रीयीकृत बॅँकेला टाळा ठोकण्याचा प्रकार कळवण तालुक्यात घडला आहे. पाचशे, हजारच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपारच्या निर्णयाला दोन महिने झाली तरीही अजून नवीन नोटा मिळविण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. नोकरदारवर्गाचा पगार होऊनही खर्चायला पैसे मिळत नाही, दोन दोन तास बॅँकामध्ये पैशांची वाट पहात बसावे लागत आहे. सर्वच व्यवहार स्वाइप मशीनद्वारे शक्य नसल्याने रोख रकमेची आवश्यकता भासत आहे. मात्र, पैशांसाठी एटीएम आणि बँकांपुढे रांगेचा सामना करावा लागत आहे. तासन्तास रांगेत उभे राहूनही हातात दोन हजारांची नोट टेकविली जाते. ही नोट सुटी करायचे म्हणजे मोठे आव्हानच, अशी स्थिती आहे.