कळवण : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळताना पाण्याचे आणि पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन यंदा पाण्याचा वापर टाळत बालगोपाळांसह मोठ्यांनीही साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करून हजारो लिटर पाण्याची बचत करून पाणी बचतीचा संदेश कळवणकरांनी दिला, तर मुलांनी शिक्षकांनी पाना-फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी खेळून शाळेच्या प्रांगणात आनंद लुटला. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट भेडसावत असल्याने विहिरी आत्ताच तळ गाठू लागल्या आहेत. कळवण शहर व तालुक्यात पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहनिमित्त पाणी बचतीची व्यापक जलजागृती तालुक्यात सुरू केली आहे. स्वयंस्फूर्तीने पाण्याचा कमी वापर करण्याचा निर्णय घेऊन कळवणवासीयांनी साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करून पाणी बचतीचा संदेश दिला. (वार्ताहर)
कळवणकरांनी साजरा केला नैसर्गिक रंगोत्सव
By admin | Updated: March 18, 2017 23:22 IST