शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

विद्यार्थ्यांमार्फत करा मिळकतींचे सर्वेक्षण

By admin | Updated: December 5, 2015 23:32 IST

देवयानी फरांदे : ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यासाठी सूचना

नाशिक : घरपट्टीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, परंतु सदर सर्वेक्षण खासगी एजन्सीमार्फत न करता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचे काम दिल्यास अनेकांना शिक्षण घेता घेता रोजगारही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूचना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेला केली आहे. याशिवाय, ‘स्मार्ट सिटी’साठी विविध सूचनाही फरांदे यांनी केल्या आहेत. शहरात महापालिका हद्दीत सुमारे ३ लाख ९२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत, परंतु अनेक वर्षांत बऱ्याच मालमत्तांचे मूल्यमापनच झालेले नसल्याचे अथवा अगोदरच्या बांधकाम नकाशात काही बदल केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने येत्या काही महिन्यांत घरोघरी जाऊन मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने यापूर्वी अनेक कामांचे सर्वेक्षण एजन्सीमार्फत केले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्चही केला आहे, परंतु या एजन्सीचा चांगला अनुभव महापालिकेला आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील महाविद्यालये, वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यामधील विद्यार्थ्यांचा समूह करून त्यांना विभाग वाटून द्यावे. त्यांच्यामार्फत मिळकतींचे सर्वेक्षण करावे. याशिवाय जाहिरात कराच्या माध्यमातूनही महापालिकेला पाच वर्षांत सुमारे ६६ कोटींपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी जाहिरात कर वसुलीच्या खासगीकरणाचीही सूचना फरांदे यांनी केली. महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाला मात्र फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे. खासगीकरणाऐवजी शहरातील सामाजिक संस्थांना शाळा दत्तक देण्याची संकल्पना फरांदे यांनी मांडली आहे. वायफायमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळू शकते. त्यातून पॅनसिटीची योजना राबविणे सोपे होईल. स्मार्ट अ‍ॅप्समध्ये सर्व सुविधांचा समावेश करण्याची सूचनाही फरांदे यांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)