नाशिक, - एके काळी देशाबाहेर फुलांची निर्यात करणारे शहर अशी ओळख असलेल्या गुलशनाबाद शहराला आता सणाच्या काळात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून फुलांची आयात करावी लागते आहे. नाशिकमधून अवघ्या काही वेर्षांपुर्वी मोगरा, झेंडू, गुलाब, निशिगंधा, लिली अशा विविध फुलांची निर्यात होत असे. त्यातील केवळ गुलाबाच्या फुलांची आता विविध जिल्हयात निर्यात होत असून इतर फुले मात्र दुसऱ्या जिल्ह्यातून मागविण्यात येत आहेत. गणेशोत्सव आणि गौरी गणपतीच्या काळात लागणारी जास्वंदी अणि मोगऱ्याची फुले बाहेरील जिल्ह्यातून खरेदी केली जाते आहे. त्यामुळे गुलशनाबादची ओळख धोक्यात आली आहे. वाढणाऱ्या इमारती आणि फुलांच्या शेतीवर उभे राहणारे लॉन्स यामुळे हा फरक पडला असून आगामी काळात नाशिकचे नाव कधी काळी गुलशनाबाद होते अशी माहिती द्यावी लागऱ्याची वेळ येते की काय अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. बाजारात होते लाखोंची उलाढालफुलांच्या बाजारात फेरफटका मारल्यास नाशिक फुलांच्या व्यापाराची राजधानी आहे, असे जाणवते. त्याचे कारणही तसेच आहे. गुजरात, बेंगळुरू, इंदूर या भागातून नाशिकच्या गुलाबाला अधिक मागणी आहे. झेंडूचा विचार केल्यास दररोज पन्नास ट्रक फुले मुंबई, पुणे, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात पोचतात. झेंडूतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळते. त्यातल्या त्यात हिवाळ्यात विशेष करून नवरात्रोत्सव, गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना मागणी वाढते. सत्तर ते ऐंशी रु पये किलो या दराने झेंडूची फुले विकली जातात. एक ट्रक फुलांची किंमत एक लाख रु पयांपर्यंत पोचते. पन्नास ट्रकचा हिशेब विचारात घेतला तरी पन्नास लाखांची उलाढाल झेंडूच्या बाजारात होते. महिन्याकाठी पंचवीस कोटींपर्यंत उलाढाल होते. नाशिकमध्ये सीझनमध्ये चार ते पाच हजार रु पयांना झेंडूची जाळी उपलब्ध होते. सीझन नसल्यास हजार ते बाराशे रुपयांना जाळी मिळते. गुलाबाच्या बाबतीतही तेच आहे. गुलाबाला वर्षभर मागणी असते; परंतु मागणीनुसार त्याचे दर कमी-अधिक होत असतात. मागणी नसल्यास शंभर रुपयांना जाळी उपलब्ध होते. मागणी वाढल्यानंतर दहा ते पंधरा रुपये प्रति नगाप्रमाणे गुलाब विकला जातो. गुलाबातून महिन्याकाठी तीस ते पस्तीस लाखांची उलाढाल होते. मागणी वाढल्यास उलाढाल एक कोटीपर्यंत पोचत असल्याचे विक्र ेत्यांचे म्हणणे आहे. गुलाब, झेंडूपाठोपाठ गेलाडा या फुलाला मागणी आहे. डाउन सीझनमध्ये दहा रु पयांना गाठोडे उपलब्ध होते; परंतु मागणी वाढल्यानंतर हीच किंमत दहापटीने वाढते. गेलाडा फुलाच्या विक्र ीतून नाशिकमध्ये महिन्याकाठी साधारणत: सत्तर ते ऐंशी हजारांची उलाढाल होते. नाशिकमध्ये सीझनमध्ये झेंडू, गुलाब, गेलाडा, गुलछडी, लिली, जरबेरा ही फुले उपलब्ध होतात, तर मोगरा, कागडा, शेवंती ही फुले ऋतूनुसार उपलब्ध होतात.मागणीत होतेय वाढनाशिकच्या ग्रामीण भागात फुलांचे उत्पादन होते. गुलाब, शेवंती, फुलंबरी, गुलछडी या फुलांनाही अधिक मागणी असल्याने बाहेरून आलेली फुले मालेगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, विंचूर या भागात मोठ्या प्रमाणात विकली जातात. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांतून नाशिकच्या फुलबाजारात झेंडूची आवक होते. त्याचे प्रमाणही आता कमी झाले आहे. गणेशोत्सव असल्याने आता केवळ गणेशाच्या फुलांची आणि दुर्वाची अवक मोठ्या प्रमाणात होते आहे.
गुलशनाबादमध्ये होतेय पुजेच्या फुलांची आयात
By admin | Updated: September 3, 2014 00:17 IST