शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

कर्मचाऱ्यांच्या कार्य सुविधेकरिता महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

By admin | Updated: January 9, 2017 01:27 IST

द्विवार्षिक अधिवेशन : आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन

 नाशिक : पोस्टमास्तरांची निवास व्यवस्था योग्य नसल्यास ती घरे नाकारून घरभाडे दिले जावे, महिला कर्मचाऱ्यांना (चाइल्ड केअर) च्या रजा नाकारल्या जाऊ नयेत, प्रत्येक मुख्यालयात चौकशी काउंटर स्वतंत्र्य सुरू करावीत, फेकनोटा डिटेक्टर व काउंटिंग यंत्रे सर्व आॅफिसेसमध्ये उपलब्ध करून द्यावीत, त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्यास जाणीवपूर्वक पुन्हा आदिवासी किंवा ग्रामीण भागात बदली देऊ नये आदि महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या नाशिक विभागाचे द्विवार्षिक अधिवेशन हॉटेल पंचवटी येथे संपन्न झाले. यावेळी सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली जावी यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आहे. प्रमुख अतिथी म्हणून सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, एआयपीइयूचे सर्कल सचिव सुरेंद्र पालव, सर्कल अध्यक्ष जगदीश पवार यांच्या उपस्थितीत अधिवेशन खेळीमेळीत पार पडले.यावेळी डॉ. कराड यांनी कर्मचारी संघटनांनी यापुढे समाजाचे नेतृत्व करणे आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले, तर नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्कलस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालव यांनी दिले. अधिवेशनातील सरकारी बंगला घेणे रद्द करणे, महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. एस. सोनवणे यांनी, तर सूत्रसंचालन अभिजित वानखेडे, बाळासाहेब कराड यांनी केले. त्यानंतर युनियनची पुढील दोन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी शैलेश कुलकर्णी, सेक्रेटरीपदी डी. एस. सोनवणे, खजिनदारपदी के. एन. चौधरी आदिंची निवड करण्यात आली.अधिवेशन यशस्वीतेसाठी डी. के. लिलके, अमोल गवांदे, पराग एकांडे, किरण वर्पे, एच. के. बारी आदिंसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)ै