शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

माणुसकी ओसरली; भिंत ओस

By admin | Updated: March 13, 2017 01:10 IST

नागरिकांची पाठ : कपड्यांऐवजी मिळतायेत चिंध्या

संदीप भालेराव : नाशिकनागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली. मात्र अल्पावधीतच नाशिककरांनी या भिंतीकडे पाठ केली असून, दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तूंऐवजी या ठिकाणी अडगळीचे साहित्य आणि कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर भिंत केव्हाच गायब झाली आहे. जेथे भिंत टिकून आहे तेथे नाशिककरांची माणुसकी ओसरल्यामुळे की काय सध्या माणुसकीची भिंत ओस पडल्याचे चित्र आहे. मागीलवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दानशूर नाशिककरांच्या भरवशावर काही सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला. आपल्या घरातील वापरात नसलेले, परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, वस्तू या ठिकाणी आणून द्यायच्या आणि ज्या गरजूंना त्या वस्तू उपयुक्त असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या’ असा या भिंतीमागचा उद्देश. शहरातील केटीएचएम महाविद्यालय उड्डाणपुलाखाली, गोल्फ क्लबची संरक्षक भिंत तसेच नाशिकरोडला काही ठिकाणी ठराविक भिंत ‘माणुसकीची भिंत’ म्हणून रंगविण्यात आली. या ठिकाणी नको असलेले कपडे अडकविण्यासाठी हॅँगर्स लावण्यात आले. महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यासाठी असलेल्या कपड्यांसाठी स्वतंत्र हॅँगर्स लावण्यात आले. त्यावेळी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अवघ्या चार-पाच महिन्यांपासून या भिंती ओस पडल्याचे चित्र आहे. गोल्फ क्लबजवळची भिंत तर गायबच झाली आहे. या ठिकाणची पाटीही पुसली गेली आहे. केटीएचएम उड्डाणपुलाखाली भिंत अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी अक्षरक्ष: फाटलेले, मळलेले इतकेच काय तर हात पुसायलाही कुणी वापरणार नाही इतके कळकट्ट कपडे ठेवून देण्यात आले आहे. म्हणचे असे कपडे की ज्याचा वापर कुणालाही होणार नाही. वस्तूतर अभावानेच येतात. त्यातही तुटलेले फ्लॉवर पॉट, रंग उडालेल्या फ्रेम, तुटलेली प्लास्टिकची फुले अशा वस्तू अधिक असतात. खरेतर या वस्तूंचा कुणालाही उपयोग होणार नाही अशाच आहेत. खरेतर इतरांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू जमा होतील, अशी आयोजकांनी अपेक्षा होती. परंतु लोक घरातील अडगळ कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तू या भिंतीजवळ टाकत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वास्तविक हा उपक्रम चळवळ म्हणून पुढे येणे अपेक्षित असताना नाशिककरांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे हा उपक्रम अर्ध्यावरती सोडून देण्याची नामुष्की ओढावली आहे. (प्रतिनिधी)