शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पदवीधर निवडणुकीची अधिसूचना जारी

By admin | Updated: January 11, 2017 01:23 IST

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अधिसूचना जारी केली असून, मंगळवारपासून नामांकन भरणे सुरू केले असले तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक होऊन त्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  पदवीधर मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याची मुदत १७ जानेवारीपर्यंत असून, १८ रोजी छाननी व २० रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. ३ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मतदान घेण्यात येणार असून, ६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असली तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.एक- दोन दिवसात महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने व त्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवरच प्रामुख्याने असल्यामुळे पदवीधर मतदारसंघासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना नेमण्यात आले असले तरी, त्यांच्याकडे नामांकन न दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख रामदास खेडकर यांनी कक्षाशी संलग्न अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यात निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.