जिल्ह्यातील २६ हजार ७३४ वेगवेगळ्या पिकांच्या बियाणांचा पुरवठा करण्यात आला. सर्वाधिक मागणी मका बियाणाला असून २१५ क्विंटल मका, ९६४.६५ क्विंटल सोयाबीन, ९७२.७६ क्विंटल भात,व ३२७ क्विंटल इतर पिकांच्या बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय ३१०९ कापूस बियाणाच्या पाकिटांचाही पुरवठा करण्यात आला आहे. खतांचाही तालुकानिहाय पुरवठा करण्यात आला असून २,२८४ मेट्रिक टन युरिया खताचा आतापर्यंत पुरवठा करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
चौकट-
या उपक्रमात सर्वाधिक (६०२६) लाभ सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. इगतपुरी तालुक्यात ३२५३ तर सर्वात कमी शेतकरी संख्या सुरगाणा तालुक्यातील आहे. या तालुक्यात केवळ ११८शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी केली होती. त्र्यंबक तालुक्यातील २७५५ तर बागायती क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफात तालुक्यात १२८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.