----------------
नांदूरवैद्यच्या राजाची हाराफुलांनी सजवलेल्या रथातून सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत साधेपणाने उत्साहात काढण्यात आलेली मिरवणूक. (२० नांदूरवैद्य १)
---------------------------
गोंदे औद्योगिक वसाहत
इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात आली. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत अनेक छोटे-मोठे कारखाने असून येथील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने जवळपास प्रत्येक कारखान्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात मोठ्या धूमधडाक्यात ‘श्री’ची अनेक वर्षांपासून स्थापना केली जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक विधी, वाद्य यावर बंदी असल्यामुळे येथील गणरायाला भव्य मिरवणूक न काढता तसेच कुठल्याही प्रकारचे वाद्य न वाजवता अतिशय साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
--------------------
गोंदे औद्योगिक वसाहतीतील दहा दिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप देतांना कारखान्यातील कामगार. (२० गोंदे १)
200921\20nsk_10_20092021_13.jpg~200921\20nsk_11_20092021_13.jpg
२० नांदूरवैद्य १~२० गोंदे १