शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

कळवण येथे ३३ केव्ही उच्चवाहिनीवर स्फोट, एका कुटुंबाचे नुकसान

By admin | Updated: January 10, 2017 00:44 IST

दुर्घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; घराला तडे; वाहिनी भूमिगत करण्याची मागणी

 कळवण : कळवण शहरातील शिवाजीनगर भागातील सबस्टेशनच्या पाठीमागे असलेल्या नागरी समूह वस्तीत सोमवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावर मोठा स्फोट झाल्याने खांबालगत असलेल्या घरांना तडे गेले असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कळवणच्या वीज वितरणच्या सबस्टेशनच्या पाठीमागील परिसरातून ओतूर, नांदुरी, दळवट या ग्रामीण भागातील गावांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी ३३ केव्हीची उच्चदाब वाहिनी गेलेली आहे. घरांच्या जवळून विद्युतवाहिनी गेलेली असल्याने यापूर्वी येथे दुर्घटना घडल्या आहेत. आज भल्या पहाटे विजेच्या खांबावर स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. सुमारे दहा मिनिटे हा ज्वाला सुरू असताना जोरात स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक या आवाजाने पहाटे झोपेत दचकून जागे होत भीतीने घराबाहेर आले. जवळीलच बापू दामू जाधव यांच्या घराच्या छतावर खांबाची एक वायर तुटून पडल्याने घराच्या छतासह मध्यभागी तडे गेले असून, घरातील वीज मीटरसह सर्व वायरिंग जळून खाक झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जाधव परिवार यातून बचावला. या घटनेमुळे हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या जाधव कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज वितरण कंपनीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी बापू जाधव यांनी केली आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करून हा प्रश्न मिटणारा नाही. सदर उच्चदाब वाहिनी भूमिगत करावी किंवा शहराच्या बाहेरून न्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)