अध्यक्षस्थानी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफचे ज्येष्ठ नेते जे.बी. सोनार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, सहसमन्वयक प्रदीप सिंह पाटील, जिल्हा टीडीएफचे उपाध्यक्ष त्र्यंबक मार्तंड, नांदगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक कदम, देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज शिरसाट कार्याध्यक्ष सचिन शेवाळे, निमंत्रक रईस अहमद, मनमाड शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल निकम आदी उपस्थित होते. या बैठकीत मालेगाव महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी एजाज अहमद मोहम्मद नजीर, कार्यवाह रईस अहमद अब्दुल हमीद, कार्याध्यक्ष पठाण अब्दुल रशीद, उपाध्यक्ष जाहीर अमीन, सहकार्यवाह लियाकत अली, तुषार देसले, कोषाध्यक्ष पठाण अबिद, आयुबी अश्फाक, हिशेबनीस मन्सुरी कमृद्दीन शमसुद्दीन, फेडरेशन प्रतिनिधी आर. डी. निकम, अनिल अहिरे, साहेबराव देवरे, शंकर खैरनार, रिजवान रब्बानी अन्सारी, निजामुद्दीन सर, इकबाल सर, अतिक अहमद, मन्सूर अहमद, एजाज सिद्दिकी, अशपाक कुरेशी, परवेज अहमद, तकमिली नदीमोरहीम, सिद्दिकी नईम, अन्सारी फैय्याज आदींचा समावेश आहे.
इन्फो
तालुका कार्यकारिणी
मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन देशमुख, कार्यवाह भरत महाजन, उपाध्यक्ष सचिन पाटील, विनोद देवरे, भरत काकडे, प्रतिभा सुभाष पाटील, पूनम शांताराम भामरे, सहकार्यवाह समाधान अहिरे, गोपाल पवार, कोषाध्यक्ष शरद जाधव, हिशेबनीस शरद जाधव प्रसिद्धीप्रमुख नंदकिशोर बोरसे, जिल्हा प्रतिनिधी जे. एस. खैरनार, जे. एन. खैरनार, सुधीर देसाई, मनोहर देसाई, जे. जे. निकम, रमेश कारभारी शेवाळे, साहेबराव आनंदा डांगळे, हरीश दीपक न्याहाळदे युवराज पगार आदींचा समावेश आहे. सूत्रसंचालन अनिल अहिरे यांनी केले व आभार निंबा बोरसे यांनी मानले.