शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

By admin | Updated: October 16, 2014 21:23 IST

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

!नाशिक : कोणी बिहारचे, कोणी गुजरातचे, कोणी पश्चिम बंगालचे, तर कोणी थेट नेपाळ, दक्षिण आफ्रिकेचे... नाना प्रांतांतली ही माणसे वर्षानुवर्षे आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहतात... तरीही दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि ते इतरांच्या चेहऱ्यावरही फुलवतात... कारण हे सारे सर्कसमधले कलावंत असतात आणि सर्कस हेच त्यांचे कुटुंब असते...नाशिकमध्ये महिनाभरापासून मुक्कामी असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमधील कलावंत आपल्या दिवाळीबद्दल दिलखुलासपणे सांगतात. देशभरात सध्या अवघ्या आठ मोठ्या सर्कस उरल्या असून, त्यांपैकी एक असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये १८० माणसे काम करतात. त्यांपैकी ७०-८० जण कलावंत, तर बाकीचे कामगार आहेत. त्यात पेंटर, सुतारापासून ते आचाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. सकाळी साडेपाच वाजता या सर्वांचा दिवस सुरू होतो. सरावानंतर नाश्ता, जेवण आणि दुपारी एक ते रात्री साडेनऊ या काळात तीन खेळ... अशी या सर्वांची दिनचर्या. सर्कस वर्षभरात साधारणत: आठ शहरे फिरते. प्रत्येक ठिकाणी एक ते दीड महिना मुक्काम असतो. प्रवास आणि तंबू उभारणीचा काळ वगळला तर जवळपास बाराही महिने सर्कस सुरू असते. कोणतेही कारण असो, सर्कस कधीच बंद राहत नाही. कारण ती बंद ठेवणे मालकासह कलावंतांनाही परवडणारे नसते. सर्कशीत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी सर्वच जाती-धर्मांची माणसे एकत्र राहतात. बहुतांश कलावंतांना वर्षभरातून, तर कित्येकांना तीन-तीन वर्षांतून एकदाच घरी जायला मिळते. त्यामुळे सर्कस हेच त्यांचे घर होते. तेथेच त्यांचे प्रेम जुळते आणि तेथेच लग्नेही होतात. दिवाळीत काही ठिकाणी फक्त दोनच दिवस सायंकाळचे शो बंद ठेवले जातात. अनेकदा तर सर्कस तेवढीही बंद नसते. त्यामुळे कलावंतांना खास दिवाळी साजरी वगैरे करायला वेळच मिळत नाही. सकाळच्या वेळेत मात्र जो-तो आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण साजरा करतो. सर्कशीच्या मालकाकडून त्यांना काही वाढीव पैसे, भेटवस्तू आणि मिठाई दिली जाते. दूरवर असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांकडूनही गोडधोड पाठवले जाते. सर्कशीचे तंबू कापडी असल्याने कलावंतांना फटाके मात्र फोडता येत नाहीत. प्रत्येक तंबूबाहेर आणि सर्कशीच्या प्रवेशद्वारावरही पणत्या लावल्या जातात. ज्याला वाटेल तो नवे कपडे घेतो. ज्याच्या-त्याच्या संस्कृतीनुसार पदार्थ तयार केले जातात. त्यांची चव प्रत्येकाला चाखायला मिळते... ‘सर्कशीच्या कंपाउंडच्या आत आम्हा सर्वांचा एकच धर्म असतो, तो म्हणजे कलावंताचा! त्यामुळे जात-धर्म कोणताही असो, दिवाळी सगळेच साजरी करतात’, असे इथले कलावंत अभिमानाने सांगतात. घरापासून दूर असलो, तरी त्याविषयी तक्रार नाही. कारण सर्कशीतली दिवाळी आम्हा सर्वांना अपार आनंद देऊन जाते. प्राण्यांचे खेळ बंद झाल्याने सर्कस आता फक्त कलावंतांच्या कसरतीवर सुरू आहे. पुढच्या काळात सर्कस बंद होण्याची भीती आहे. असे व्हायला नको.. कारण सर्कशीवरच आमचे पोट अवलंबून आहे’, असे काही जण पोटतिडकीने सांगतात. ‘अन्य समाजाकडून तुम्हा कलावंतांना काय अपेक्षा आहेत’, असे विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ‘बाकी काही नाही, फक्त सर्कस चालू राहायला हवी! यापलीकडे लोकांनी आमच्यासाठी काही करावे अशी अपेक्षा नाही... सुटी मिळत नसल्याचीही तक्रार नाही. कारण सर्कशीतले खेळ हाच आमचा श्वास आहे... आणि आपण श्वास घेणे कधी थांबवतो का?’ - आयुष्याची ‘सर्कस’ होऊनही त्याच सर्कशीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचे हे उद्गार किरकोळ बाबींवरून तक्रारीचा सूर आळवणाऱ्यांसाठी झणझणीत अंजनच असते!