शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्याची शिक्षणपद्धती निर्माण व्हावी :  राम ताकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:01 IST

नव्या शैक्षणिक धोरणात अनेक शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता, तर काहींनी अतिस्वायत्तता बहाल करण्यात आल्यामुळे औपचारिक विद्यापीठेही मुक्त शिक्षण देणार असल्याने मुक्त विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुक्त आणि पारंपरिक विद्यापीठांमधील संभाव्य स्पर्धा लक्षात घेता मुक्त विद्यापीठांना वेगळा मार्ग शोधावा लागणार असून, स्वयंअध्ययनाची एकलव्य शिक्षणपद्धती मुक्त विद्यापीठांना शोधावी लागेल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांनी केले.

ठळक मुद्देमुक्त विद्यापीठांना वेगळा मार्ग शोधावा लागणार प्रा. डॉ. राम ताकवले डी.लिट. पदवीने सन्मानित मुक्त विद्यापीठांनीदेखील प्रासंगिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे

नाशिक : नव्या शैक्षणिक धोरणात अनेक शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता, तर काहींनी अतिस्वायत्तता बहाल करण्यात आल्यामुळे औपचारिक विद्यापीठेही मुक्त शिक्षण देणार असल्याने मुक्त विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुक्त आणि पारंपरिक विद्यापीठांमधील संभाव्य स्पर्धा लक्षात घेता मुक्त विद्यापीठांना वेगळा मार्ग शोधावा लागणार असून, स्वयंअध्ययनाची एकलव्य शिक्षणपद्धती मुक्त विद्यापीठांना शोधावी लागेल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लायब्ररी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते.  यावेळी डॉ. ताकवले म्हणाले, युग बदलल्यानंतर अनेक परिमाणे बदलतात, समाजात आमूलाग्र बदल घडतो. जुने अंतर्धान पावते, नवा समाज निर्माण होतो. औद्योगित तंत्रज्ञानानंतर समाज डिजिटल युगाकडे आला आहे. तंत्रज्ञानानातील संशोधनाने अनेक कामे सोपी झाली. माणसांचे काम यंत्रे करू लागली आहेत. ही अपरिहार्यता असल्याने माणसांना जगविणारी आणि स्वयंसक्षम आणि शिक्षित होणारी अभ्यासप्रणाली विकसित करावी लागणार आहे, असे ताकवले म्हणाले. डिजिटल युगात मुक्त शिक्षण टिकविण्यासाठी दैनंदिन व्यवहारावर म्हणजेच सर्वसामान्यांशी निगडीत शिक्षण विकसित करावे लागेल. लोकाभिमुख म्हणजेच लोकांकडे जाणारी शिक्षणपद्धती अशी निर्माण झाली पाहिजे की लोकशिक्षण वाढत राहील. यामध्ये तुम्हाला समोर ठेवून लोकांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. स्वयंअध्ययनातून विद्यार्थी एकल व्याप्रमाणे उच्च पातळीवर गेला पाहिजे. भावी काळाचे शिक्षण म्हणून मुक्त विद्यापीठाने शिक्षणक्रम विकसित केले पाहिजे, असे प्रा. ताकवले म्हणाले. याप्रसंगी प्रा. ताकवले यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. यावेळी ताकवले यांच्या जीवनकार्यावरील चित्रफित दाखविण्यात आली. शिक्षणक्षेत्रातील बदललांचा स्वीकार करताना मुक्त विद्यापीठांनी देखील बदलण्याची वेळ आलेली आहे.बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षणसंस्थांना मोठी स्वायत्ताता दिल्याने तेही मुक्त शिक्षणाकडे वळले आहेत. त्यामुळे मुक्त विद्यापीठांचे होणार काय असा प्रश्न पडतो. पारंपरिक विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठे यांच्यात होणारी स्पर्धा ही अविभाज्य असल्याचे स्वीकारून मुक्त विद्यापीठांनीदेखील प्रासंगिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे बदलण्यास नक्कीच कालावधी लागेल, परंतु ही अपरिहार्यता आहे. - डॉ़ राम ताकवले, प्राध्यापक

टॅग्स :universityविद्यापीठ