निफाड : धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन म्हामूनकर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निफाड डॉक्टर्स असोसिएशनकडून जाहीर निषेध करण्यात येऊन या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे निफाड डॉक्टर्स असोसिएशनने निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्याकडे केली आहे.रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले करण्याचे असे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. डॉक्टरांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने अत्यावस्थ रुग्णांना सेवा द्यावी की नाही, असा सवाल निर्माण होणे स्वाभाविक आहे. याचा समाजातील सर्व घटकांनी विचार करणे अत्यावश्यक आहे. भविष्यकाळात असा प्रकार होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणांनी धुळे मारहाण प्रकरणातील संशयितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निफाड तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.डॉक्टर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, निफाड शहराध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी सचिव डॉ. सचिन ढेमसे, डॉ. किरण राठी, घनश्याम वैष्णव, रमेश वाळुंज, माधव काळे, संजय हाडपे, नारायण लोखंडे, विलास नाठे, जितेंद्र वडघुले, निलेश डेर्ले, अरुण कातकाडे, दीपक बाहेती, रुपेश वाघ, प्रवीण थोरात, सुनील कापसे, अमोल पवार, शांताराम पानगव्हाणे, प्रवीण सोनवणे, भूषण सानप, अमोल घुगे, भाऊसाहेब काळे, ऋषीकेश दौंड, भूषण राठी आदि डॉक्टर्स उपस्थित होते. तहसीलदार भामरे यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली. (वार्ताहर)
डॉक्टरांना मारहाण प्रकरणी निफाडला निषेध
By admin | Updated: March 18, 2017 23:42 IST