नाशिक : अंबडजवळील चुंचाळे येथे भाजलेल्या साठी वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंदर उर्फरामचंद्र किसन गोवर्धने असे या वृद्धाचे नाव असून, गोवर्धने हे हात शेकत असताना त्यांचा हात पंधरा टक्के भाजला होता. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Updated: January 21, 2015 01:55 IST