शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
3
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
4
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
5
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
6
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
7
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
8
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
9
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
10
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
12
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
13
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
14
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
15
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
16
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
17
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
18
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
19
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
20
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

शासनाचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर

By admin | Updated: July 16, 2016 00:44 IST

हमीभावाची खात्री, तरच शेतमाल नियमन विक्री

 गणेश धुरी नाशिककाही का होईना, शेतकरी हिताचा निर्णय गेल्या साठ वर्षांत होत नव्हता, तो आम्ही आल्या आल्या घेतला, असे म्हणण्यास थोडी जरी जागा राज्य सरकारने निर्माण केलेली असली तरी, हा निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. म्हणजे सरकारला खरोखरच शेतकरी हिताची काळजी आहे, असे म्हणता येईल. आधी शेतकऱ्यांच्या शेतमालाला ‘हमीभाव’ देण्याचे निश्चित धोरण आखण्यापेक्षा नियमनमुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांच्या आणि व्यवस्थेच्या कितपत पचनी पडेल, यात शंका आहे. पायाच्या पंजाला खरूज झाली म्हणून संपूर्ण पायच तोडण्याचा हा प्रकार नियमनमुक्तीच्या बाबतीत घडत आहे. नाही तर आजमितीस व्यापाऱ्यांच्या संपामुळे भर पावसात शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीची वेळ आली नसती.उद्या उठून कोणी जर या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच (नव्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने ती तयारी केलीच आहे) तर या निर्णयाच्या मागील सहकार विभागाच्या एका अध्यादेशासारखा हाही आदेश पालापाचोळ्यासारखीच स्थिती होण्याची अधिक शक्यता आहे. घोटाळेबाज नागरी आणि जिल्हा बॅँकेच्या संचालकांना पुढील दहा वर्षे निवडणूक लढविण्याची बंदी घालण्याच्या निर्णयाचे असेच काहीसे घोंगडे भिजते आहे. त्यात आता या निमयनमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा ठरण्याची अपेक्षा ठेवणे कितपत संयुक्तिक आहे. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश आता सहकार आणि पणन विभाग काढत आहे. आधी त्यांनीच व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीचे परवाने द्यायचे, मग त्यांनीच त्यांच्या परवान्यांवर टाच आणायची. यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व ते कशासाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुळातच आजमितीस राज्यातील सहकार आणि पर्यायाने कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढण्यासाठीच हा नियमनमुक्तीचा निर्णय झाला का? असा विचार आता विरोधी पक्षाकडून सुरू आहे. त्यात व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजार समित्यांचे ठप्प झालेले व्यवहार आणि त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्याच शेतमालाची थांबलेली विक्री पाहता, सरकारला हा आरोप खोडून काढण्यासाठी अनेक कारणे द्यावी लागतील. जी कारणे तूर्तास तरी सरकारकडे नाहीत, असे म्हणावे लागेल. बाजार समिती सोडून जर शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली तर काय दूधविक्रेत्यासारखे ‘दारोदार’ आम्ही फिरायचे की काय? आणि त्यासाठी मग संपूर्ण कुटुंबच शेतमाल विक्रीला जुपायचे काय? या शेतकऱ्यांच्या मार्मिक प्रश्नांवर उत्तर ते काय द्यायचे, याचीही तयारी यंत्रणेने केली पाहिजे. यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सरकारची मानसिकता असेल, तर त्यासाठी दूरगामी धोरण आखून त्याची अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे. केवळ नियमनमुक्ती करून शेतकरी व्यापाऱ्यांच्या जोखडातून मुक्त होणार नाही. त्यासाठी समांतर पर्यायी व्यवस्था तयार करणेही तितकेच गरजेचे आहे. (समाप्त)