नाशिक : मुंबईहून नागपूरकडे डांबर घेऊन जाणाऱ्या टॅँकरचालकाला अडवून टॅँकरमधील डांबर दुसऱ्या रिकाम्या टॅँकरमध्ये भरण्याचा प्रयत्न डांबर चोरणाऱ्या टोळीकडून करण्यात आला. यावेळी टॅँकरचालकाने विरोध केल्याने त्यास टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. चेंबूर येथील अग्रवाल ट्रान्सपोर्ट येथून डांबराचा टॅँकर घेऊन (एमएच ०४, इएच ०४५३) चालक इबरार हारून शेख (३४, रा. चेंबूर) यास शनिवारी (दि.७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दहावा मैलच्या अलीकडे डांबरची वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या टॅँकरचालकाने त्यांचा टॅँकर आडवा टाकला व शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या गळ्याला धारधार शस्त्र लावून त्यास टॅँकरमध्ये बसवून दहावा मैलपर्यंत घेऊन गेले. दरम्यान, त्याच्या जवळील २७ हजाराची रोकड व मोबाइल हिसकावून घेत त्याला रस्त्यालगत फेकून संशयित पसार झाले.
टॅँकरचालकावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: January 9, 2017 01:53 IST