शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रंगी रंगला दत्त पालखी सोहळा

By admin | Updated: March 18, 2017 23:27 IST

कसबे सुकेणे : रंगाची उधळण, भक्तीचा जल्लोष आणि भाविकांची मांदियाळी अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीनिमित्त महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोत्तर रंगला.

 कसबे सुकेणे : रंगाची उधळण, भक्तीचा जल्लोष आणि भाविकांची मांदियाळी अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीनिमित्त महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोत्तर रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रंगांची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेला व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास रंगपंचमीपासून प्रारंभ झाला. मिरवणुकीत पालखी पुढे उधळण्यात येणारा रंग भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात. पालखी सोहळ्यात भाग घेण्यासाठी व नवसपूर्तीसाठी राज्यभरातून भाविक मौजे सुकेणे येथे दाखल होतात. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रंगपंचमीला दुपारी साडेतीन वाजता मंदिराच्या पूर्व महाप्रवेशद्वारातून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर,गोपीराजशास्त्री सुकेणेकर, दत्तराज सुकेणेकर यांनी महंत सुकेणेकर बाबा यांच्या उपस्थितीत देवास विडा अवसर देऊन वंदन केले. मौजे सुकेणेच्या प्रथम नागरिक सरपंच सुरेखा गडाख, उपसरपंच नंदकुमार हांडोरे, पंचायत समितीचे सभापती पंडित अहेर, रत्ना संगमनेरे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, विलास गडाख, रावसाहेब भंडारे, डी. बी. मोगल, अशोक निकम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी डॉ. किरण देशमुख, माधवराव मोगल, रामभाऊ मोगल, सुधाकर भंडारे, विराज भंडारे, शंकर काळे, नानासाहेब भंडारे, कडू पाटील, उत्तम भंडारे, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, शांतीलाल जैन, जिल्हा महानुभाव समितीचे वामन आवारे दौलत मोरे आदि उपस्थित होते. दत्तमंदिराच्या वतीने मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार केला. दुपारी ४ वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी आमदार मंदाकिनी कदम यांनी देवदर्शन घेऊन श्री मूर्तीस विडा वाहिला. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक, भक्तीचा जल्लोष आणि रंगांची उधळण , डीजेवर तालावर थिरकणारी तरु णाई असा उत्साह सुकेणेत पहावयास मिळाला. रात्री उशिरा पालखीचे पुरातन विसावा पारावर आगमन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजता सनईच्या स्वरात पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला लागली. पहाटे साडेपाच वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. रंगपंचमी खेळण्याची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या मौजे सुकेणेची यात्रा रंगांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा नोटाबंदीचा फटका राज्यातील काही यात्रोत्सवांवर बसला. मात्र सुकेणेच्या यात्रोत्सवात तो जाणवला नाही. भाविकांचा ओघ सुरू असल्याने सर्व खाद्यपदार्थांसह इतर वस्तूची विक्र ी चांगली झाली़ अशी माहिती यात्रेत श्रीरामपूरहून खेळणी विक्र ीसाठी आलेले विक्रेते सुरेश पवार यांनी दिली. यात्रेत मोठमोठे रहाट पाळणे दाखल झाले आहे. यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे़ (वार्ताहर)