आरोग्य सेवा न पोहोचलेल्या आदिवासी व दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. फेक डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते. सर्दी, खोकला, तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या, औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागल्याचे उदाहरणे आहेत.
----
चौकट===
कोरोना रुग्णांवरही केले उपचार
जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना काळात या बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावले. कोरोनाच्या रोगाचे निदान न करताच त्यांनी रुग्णांवर उपचार केले. त्यातून अनेकांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले तर अनेक जण दगावल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी सरकारकडेही केली होती.
=====
तालुका पातळीवर समित्या
बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी तालुका पातळीवर समित्या गठित करण्यात आल्या असून, त्याचे प्रमुख तालुका वैद्यकीय अधिकारींना करण्यात आले आहे. या समितीत गट विकास अधिकारी, तहसीलदार, गावातील सरपंच, आरोग्य सेविका, ग्रामसेवकांचा समावेश आहे.
------
अशी केली जाते चौकशी
बोगस डॉक्टरबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी सदरची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्याची खात्री झाल्यास संबंधित बोगस डॉक्टरला नोटीस देऊन त्याच्याकडील वैद्यकीय पात्र कागदपत्रांची मागणी केली जाते. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित डॉक्टर विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाते.
----
तक्रार मिळाल्यास कारवाई
जिल्ह्यात बोगस डॉक्टर विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास त्याची तात्काळ खात्री केली जाते. कोरोनामुळे आरोग्य विभाग व्यस्त असल्यामुळे मध्यंतरी थांबलेली कारवाई आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तशा सूचना तालुका पातळीवर देण्यात आल्या आहेत.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------