नाशिक : प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक तीसमधील मतमोजणीवरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भाजपा वगळता सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करीत महापालिका कार्यालयासमोर गोंधळ घातलाय. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह काही उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत महापालिका आयुक्तांना निवदेन दिले. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते महापालिका कार्यालयासमोर एकवटल्याने काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु सर्वपक्षीय नेत्यांनी व संबंधित प्रभागांतील उमेदवारांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतरही समधान न झाल्याने याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मतमोजणी प्रकरणी झालेल्या गोंधळाप्रकरणी उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना अजय बोरस्ते, विजय करंजकर, रंजन ठाकरे आदि.
महापालिकेसमोर सर्वपक्षीयांचा गोंधळ
By admin | Updated: February 24, 2017 01:18 IST