सातपूर : विविध उपक्रमांचे आयोजन करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयात हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भविष्य निर्वाह निधी क्षेत्रिय कार्यालयात आयुक्त जगदीश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हिंदी निबंध लेखन, टिपण आलेखन, वक्तृत्व आदिंसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी करन्सी नोट प्रेसचे प्रमुख प्रबंधक संदीप जैन, भविष्य निधी आयुक्त जगदीश तांबे, सहायक आयुक्त हेमंत राऊत, देवेंद्र सोनटक्के, शैलेंद्र सिंह आदि उपस्थित होते.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयात स्पर्धा
By admin | Updated: October 4, 2015 22:45 IST