पंचवटी : विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शेकडो स्वयंसेवकांनी रस्त्यात पडलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या अन् प्लॅस्टिक पिशव्या उचलून शिस्तीचे दर्शन घडविले. मोर्चात सहभागी मराठा समाज बांधवांनी अत्यंत शिस्तीचे दर्शन घडवित कुठेही कचरा होणार नाही तसेच प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रदूषण होणार नाही यासाठी ही मोहीम राबविली. तपोवनात सकाळी सात वाजेपासून मोर्चेकरी येण्यास सुरुवात झाल्यानंतर स्वयंसेवी संस्थांतर्फे मोफत पाणीवाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रिकाम्या बाटल्या तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्या परिसरात फेकून देऊ नये, यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी हातात गोण्या घेऊन प्लॅस्टिक पिशव्या उचलल्या. पंचवटीतील उत्तमराव ढिकले वाचनालय परिसरातील मोर्चा मार्गावर पसरलेल्या पाण्याच्या पिशव्या, विविध खाद्यपदार्थांच्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करून त्या एकत्रिक केल्या. या कचऱ्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावणार असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.
स्वयंसेवकांनी राबविली रस्त्यांवर स्वच्छता मोहीम
By admin | Updated: September 24, 2016 23:37 IST