चांदवड : देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत चांदवड येथे लाल कांद्याची विक्रमी आवक झाल्याची माहिती चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली. शनिवारी (दि. ७) चांदवड बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांदा शेतमालाच्या १२६१ वाहनांचा लिलाव होऊन लाल कांद्याची सर्वाधिक २४ हजार क्विंटल आवक झाल्याची नोंद करण्यात आली. या दिवशी कांद्याला कमीत कमी ३००, तर जास्तीत जास्त ७७५ व सरासरी ६७५ रुपये बाजारभाव मिळाले. कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत असून, बाजारभाव स्थिर असल्याने तालुक्यातील व तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांनी चांदवड येथे कांदा विक्रीस पसंती दर्शविली आहे. उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरीवर्गात नाराजी दिसून येते आहे. दरम्यान, नववर्षातील पहिल्याच सप्ताहात दि. ३ जानेवारी २०१७ ते ७ जानेवारी २०१७ अखेर एकूण ९७,५५४ क्विंटलची आवक झाल्याची नोंद आहे. (वार्ताहर)
चांदवडला लाल कांद्याची विक्रमी आवक
By admin | Updated: January 10, 2017 00:45 IST