शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

चांदवडला विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: March 2, 2016 22:46 IST

पाणीटंचाई : नागरिक हैराण; तालुक्यातील जलाशय कोरडेठाक

महेश गुजराथी  चांदवडसातत्याने दुष्काळ तालुक्याच्या पाचवीला पूजलेला. पाणीटंचाईवर मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर कायमस्वरूपी ४४ गाव नळयोजनेसारखी नळ योजना प्रभावीपणे राबविल्यास या तालुक्यातील टॅँकरमुक्ती खऱ्या अर्थाने होईल.तालुक्यातील अनेक गावांना पावसाळ्यात पाऊस न पडल्याने आज पाणीटंचाईचे संकट भासत आहे. तालुक्यातील बरीच जलाशये कोरडीठाक पडली आहेत. त्यातील खोकड तलाव, केद्राई, वागदडी धरणांची आता उन्ह वाढू लागल्याने दमछाक होत आहे. तर तालुक्यात खासगी व सार्वजनिक विहिरी या सुमारे ३००च्या आसपास असून, पावसाळ्यात पाणी न झाल्याने शेतीला काय तर पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील काही भागात चांगला तर काही भागात काहीच पाऊस न झाल्याने दरवर्षी टॅँकरची मागणी वाढत असते. गेल्यावर्षी २७ गावे, १९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये खर्च या टॅँकरद्वारे शासनाला करावा लागतो तर गेल्या वर्षी अगदी जून ते जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाई असल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे.वडनेरभैरव व वडाळीभोई भागात बऱ्यापैकी पाणी असल्याने तेथील समस्या एवढी बिकट नाही मात्र पुर्वपट्टा त्यात दरेगाव , निमोण या गावांना गेल्या दोन वर्षीपर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र या गावांना ४२ गाव नांदगावसह नळपाणीपुरवठा योजना झाल्याने या भागातील १७ गावांचा पाणीप्रश्न काही अंशी कमी झाला आहे. दरेगाव व निमोण भागातील पाणीटॅकर बंद झाले आहेत मात्र नाग्या साक्या धरणातील पाणीसाठा बेतात असल्याने येथेही या वर्षी टंचाई जाणवेल असा अंदाज आहे. तर चांदवड तालुक्यातील ४४ गाव नळपाणीपुरवठा योजनेतील गावाची संख्या वाढून ती संख्या आता ६० वर गेली आहे. यंदा मात्र पाऊस कमीच असल्याने ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल , मे, जुन मध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाई जाणवेल तर चारा टंचाई जाणवेल असा अंदाज बळीराजा व्यक्त करीत आहेत तर काही भागातील विहीरी व बोअरवेलने आतापासूनच तळ गाठला आहे. सध्या चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीच्या लक्ष्मीनगर, मेसनखेडे येथील जेजुरे वस्ती , मेसनखडे खुर्द येथील माळवी वस्ती तसेच पुर्वभागातील उसवाड, राहुड , तर तळेगावरोही गटातील बरीच गाव व दुगाव गटातील बरीच गावे पाणी टंचाईचा सामना करतील असा अंदाज आहे. चांदवड तालुक्याला वरदान ठरणारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणांची ४४ गाव नळयोजनेचे आता ६० गावे अशी संख्या झाली असून ही पाईप लाईन धोंडबे ते चांदवड पर्यंत जुनी झाल्याने अनेक वेळा फुटते तर काही ठिकाणी पाणी चोरीच्या घटना घडत असल्याने बऱ्याच गावांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.अशी परिस्थिती आहे.