सटाणा : भाजपा सरकारने फसवी कर्जमाफी व फसवे आश्वासन देऊन एकप्रकारे जनतेला गाजर दाखवले असल्याची टीका करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१७) येथील आठवडे बाजारात गाजर वाटून भाजपा सरकारची खिल्ली उडवली. दरम्यान शिवरायांविषयी अपशब्द काढणाºया भाजपाच्या एका पदाधिकाºयाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.शहरातील टिळक रोडवर शनिवारी दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार विरु द्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. या सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केली आहे. शेतकºयांना फसवी कर्जमाफी देऊन घोर निराशा केली आहे. सर्वच आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. यावेळीभाजपाच्या एका पदाधिकाºयाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. उडवली.
सटाण्यात राष्टÑवादीतर्फे गाजर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:38 IST
सटाणा : भाजपा सरकारने फसवी कर्जमाफी व फसवे आश्वासन देऊन एकप्रकारे जनतेला गाजर दाखवले असल्याची टीका करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१७) येथील आठवडे बाजारात गाजर वाटून भाजपा सरकारची खिल्ली उडवली. दरम्यान शिवरायांविषयी अपशब्द काढणाºया भाजपाच्या एका पदाधिकाºयाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
सटाण्यात राष्टÑवादीतर्फे गाजर वाटप
ठळक मुद्देभाजपाच्या एका पदाधिकाºयाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. भाजपा सरकार विरु द्ध जोरदार घोषणाबाजी