शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

By admin | Updated: February 26, 2017 00:16 IST

भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

नाशिक : दरवेळी जेमतेम काठावर पास होणारा विद्यार्थी यंदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार, ही भावना सुखावणारी ठरू शकते. परंतु केवळ चांगले गुणच नाही तर ‘डिस्टिंगशन’मध्ये असा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यासह साऱ्यांना धक्का बसावा, अगदी अशीच अवस्था भाजपासहीत सर्वांची झाली आहे.  आजपर्यंत भाजपा केवळ पडण्याच्याच भूमिकेत राहिला आहे. त्यामुळे यंदा भाजपाला अनुकूल वातावरण असले तरी किती जेमतेम तीस-पस्तीस जागा मिळतील, त्या तुलनेत शिवसेना मात्र अधिक जागा मिळवेल हा सार्वत्रिक अंदाज खोटा ठरविणारा हा निकाल आहे.  केंद्र आणि राज्यातील यशानंतर भाजपाचा यंदाच्या मनपा निवडणुकीतील पवित्रा निश्चितच आक्रमक असला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वर्षात मराठवाड्यासाठी सोडावे लागलेले पाणी, आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाचा प्रस्ताव आणि विकासकांची झालेली अडचण या विषयावर सर्वच पक्षांनी भाजपाची कोंडी केली होती. त्यातच नोटांबदीचा विषय पुढे आला आणि त्यावरूनही भाजपाला लक्ष बनविले गेले. हे मुद्दे आपल्या पथ्यावर पडेल असे साऱ्याच विरोधी पक्षांना वाटत होते. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात दिलेला प्रवेश हा मुद्दा अडचणीचा ठरला. भाजपाच्या विरोधातील या चर्चांमुळे विरोधकांना उकळ्या फुटणे स्वाभाविक असले तरी भाजपाने मात्र नियोजनावर भर दिला.  मुळात पक्षात आयाराम आणतांनाही कुठे कोण प्रभावी ठरेल त्यालाच प्रवेश देण्याचे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचे धोरण अचूक ठरले. शिवसेनेच्या नगरसेवक ‘भरती’शी भाजपाने स्पर्धा केली नाही. उलट अन्य पक्षांतील नगरसेवकांना प्रवेश नाकारण्याचे धाडस या पक्षाने केले. प्रसंगी ज्यांच्याशी दोन हात केले अशा विरोधकालाही पक्षात स्थान देण्याच्या निर्णयामुळे सत्ता आणण्याच्या दृष्टीनेच पावले पडत होती. भौगोलिकदृष्ट्या ज्या प्रभागात सक्षम उमेदवारांचा समतोल साधला जाईल, अशी व्यवस्था करताना दोन जुने आणि दोन नवे अशी प्रारंभिक रचना होती. जो उमेदवार अन्य तिघांना आपल्यासमवेत निवडून आणेल, अशांना प्राधान्य देण्यात आले. पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज झाले असले तरी व्यावहारिक दृष्ट्या निर्णय घेतले गेले.  उमेदवारीतील गोंधळ, घराणेशाही डावे उजवे त्यातच तिकीट विक्रीचे व्हायरल झालेले व्हिडिओ हे सर्वच निवडणुकीत भाजपाला अडचणीत आणणारे ठरत होते. त्यातच पक्षात तीन आमदार असले तरी विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील असा स्थानिक वडीलधारी ज्येष्ठ नेता नसल्याने साराच गोंधळ होता. त्यातल्या त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समन्वयाची भूमिका घेत पक्षातील वाद वाढू दिले नाहीत. तसेच विरोधकांना उत्तर दिले. निवडणुकीतील सरकारशी संबंधित वादग्रस्त मुद्याचा फटका भाजपाला बसणार असे चित्र असले तरी या साऱ्याच प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेवटच्या सभेत उत्तर दिले आणि थेट नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नूर पालटला. आमदारांची आपसातील स्पर्धा आणि सत्ता आणल्यानंतर परफॉर्मन्सवर आधारित राज्यमंत्री मंडळात मिळणारी संधी त्यातच मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी हे सर्व पक्षांतर्गत वादाला पूरक असले तरी या वादात मतदार मात्र फसला नाही. अनेक अंतर्गत विखारी प्रचारानंतरही मतदारांना जे वाटले तेच त्यांनी केले आणि भरभरून मतदान केले. (प्रतिनिधी)