नाशिक : नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसने सोयीच्या सत्तेसाठी सेना, भाजपाशी हातमिळवणी केलेली असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, शनिवारी भाजपा व राष्ट्रवादीचे सदस्य स्वतंत्रपणे अज्ञातस्थळी रवाना झाले असले तरी, एकाच दिवशी त्यांचे जिल्ह्णातून बाहेर जाणे अनेकांच्या भुवया उंचावून गेल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने त्याबाबतच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याची घोषणा यापूर्वीच शिवसेनेने केली असून, भाजपाची मदत घेण्याच्या मन:स्थितीत सेनेचे नेतृत्व नाही, त्यामुळे संख्याबळ गाठण्यासाठी सेनेने कॉँग्रेस व राष्ट्रवादीला यापूर्वीच गळ टाकली आहे, त्यामुळे सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्यानंतर कॉँग्रेसचेही सदस्य गायब झाले आहेत, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य यंदा पहिल्यादांच बाहेर पडले आहेत. त्यामुळे सत्तेसाठी सेनेचे गणित जुळल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे भाजपानेदेखील या निवडणुकीत उडी घेण्याचे निश्चित केले असून, त्यांना हवे असलेले संख्याबळ पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपा, राष्ट्रवादीचे सदस्य सहलीला
By admin | Updated: March 19, 2017 00:00 IST