नाशिक : नाशिकमध्ये २१ वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय बाबाज् करंडक एकांकिका स्पर्धेला लोकोत्सव २०२१ अंतर्गत प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारच्या पहिल्या दिवशी एकूण १३ एकांकिका नाशिककर नाट्यरसिकांना बघण्याची संधी मिळाली.
नाशिकच्या ऋतम प्रॉडक्शन यांनी शंतनु चंद्रात्रे लिखित व अनुप माने दिग्दर्शित ‘पडलं का’ ही एकांकिका प्रथम सादर केली. नाशिकच्याच सपान या संस्थेने ‘कलंडलेले पेले’ ही शंतनु चंद्रात्रे लिखित व राहुल गायकवाड यांनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेत रंग भरले. तर नाशिकच्याच रुद्राक्षम थिएटर्स यांनी श्रीपाद देशपांडे लिखित व सतीश वऱ्हाडे दिग्दर्शित ‘फिल्मसिटी’ या एकांकिकेत ग्लॅमरस रंग भरले. नाशिकच्या ड्रामा डिटेक्टेड या संस्थेने पहिल्या दिवसातील अखेरची एकांकिका ‘भोकरवाडीचा शड्डू’चे लेखन अजय पाटील यांनी केले. दिग्दर्शन रोहित जाधव यांचे होते. त्याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, जळगावच्या कलाकारांच्या एकांकिकादेखील सादर करण्यात आल्या. पुढील दोन दिवसात एकूण ३४ एकांकिका सादर होणार आहेत.
फोटो
११कलंडलेले पेले