राणेनगर येथील सह्याद्री व्यायाम शाळेजवळ सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रभागातील राणे नगर ,चेतना नगर ,राजीव नगर, किशोर नगर, सदिच्छा नगर ,वासन नगर ,समर्थ नगर, सोनवणे मळा, नागरे नगर, जायभावें नगर ,सेंट फ्रान्सिस शाळा परिसर ,पोलीस वसाहत आदी भागातील रस्त्यांचा यात समावेश आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, वसंत गिते, सुनील बागुल, नितीन भोसले, सुधाकर बडगुजर, सतीश सोनवणे, गणेश गीते, अजय बोरस्ते, विलास शिंदे, जगदीश पाटील, सुदाम डेमसे, अमोल जाधव, देवानंद बिरारी,वंदना बिरारी आदींसह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. (वा.प्र.)
शनिवारी प्रभाग ३१ मध्ये डांबरीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST