‘ओझर : नाशिक येथे निघणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ओझर कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळेस विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.ओझरमधून सुमारे वीस हजार मराठा समाजबांधवांसह इतर समाजबांधवही मोर्चात सहभागी होणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी समाजबांधवांनी आपापल्या वाहनाने नाशिकला जाण्याचे ठरविण्यात आले. बैठकीत सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शुक्रवारी येथील समितीने येथील शाळांमध्ये जाऊन शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले. संपूर्ण ओझर परिसर भगवेमय झाले असून, शहरासह महामार्गावर भगवे ध्वज, विविध होर्डिंग्स लावले आहेत. जनजागृतीसाठी शहरात व उपनगरांमध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांना मोर्चात जास्तीत जास्त प्रमाणात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व शाळा व कॉलेजला शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जेवढे शक्य होईल तेवढ्या कमी गाड्या व जास्त माणसे असे समीकरण ठरविण्यात आल्याचे येथील मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रकाश महाले, दीपक जाधव, अशोक कदम, सुनील कदम, प्रल्हाद कदम, नरेंद्र थोरात, माधव कदम, गणेश आंबेकर, नितीन काळे, सतीश पगार, विक्रम पवार, महेश गाडगे, संजय पगार, प्रकाश घुमरे, संदीप घुमरे, सचिन आढाव, नारायण शेटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
वाहतूक कोंडी होऊ न देण्याचे आवाहन
By admin | Updated: September 24, 2016 00:57 IST