शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

...आणि त्याने वापरली स्वत:चीच चोरलेली गाडी

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

वाहनाच्या कागदपत्रांत फेरफार : संशयित पोलीसांच्या ताब्यात

वाहनाच्या कागदपत्रांत फेरफार : संशयित पोलीसांच्या ताब्यातपंचवटी : दोन वर्षापुर्वी गंगापूर पोलीस ठाण्यात वाहनचोरी झाल्याची तक्रार देऊन नंतर स्वत:च दुचाकीच्या क्रमांकात खाडाखोड करून चोरलेली दुचाकी वापरणारा भामटा अलगदरित्या पोलीसांच्या जाळयात आला आहे. सागर प्रेमचंद त्रिभुवन असे संशयिताचे नाव असुन पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने वाहन तपासणी दरम्यान ही कारवाई केली आहे. वाहनचोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने पंचवटी पोलीसांनी संशयिताला गंगापूर पोलीसांकडे सुपूर्द केले आहे. गंगापूर पोलीसांनी खोटी फिर्याद नोंदविली म्हणून संशयिताला ताब्यात घेतले असुन त्रिभुवन याने इंन्श्युरन्ससाठी चोरीची खोटी तक्रार देत फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. काल दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी म्हसरूळ गुलमोहर नगर भागात वाहनतपासणी करत असतांना सीबीझेड क्रमांक (एम. एच. १५ डी. एच. ११०९) ही संशयास्पद जातांना दिसली म्हणून ती थांबवून कागदपत्रांची चौकशी केली त्यावेळी गजपंथनगर येथे राहणार्‍या संशयित सागर त्रिभुवन याने कागदपत्रे दाखविली मात्र त्यावर खाडाखोड व वाहन क्रमांकातही बदल दिसल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घडला प्रकार कथन केला आणि पोलीसही अचंबित झाले. त्रिभुवन याने दोन वर्षापुर्वी नवी सीबीझेड चोरी गेल्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्यानंतर आरटीओतून वाहनाचा क्रमांक आल्यानंतर त्रिभुवन याने मिळालेल्या क्रमांकातील शेवटचा अंक खोडून तिच गाडी वापरत होता त्यानंतर काही दिवसांनी त्याने इंन्श्यूरन्स कंपनीकडून इंश्यूरन्स पास करून घेतला व फायनन्सची रक्कम परतफेड केली होती. वाहनाचे कागदपत्रे बघितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलीसांनी संशयित त्रिभूवन याला ताब्यात घेतले असुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे राजेश निकम, प्रविण वाघमारे, राजेश लोखंडे, संजय राऊत, बाळू लभडे आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर) मोठी टोळी इंश्यूरन्स पास करण्यासाठी स्वत:च स्वत:ची गाडी चोरून पोलीसात तक्रार दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात मोठी टोळी कार्यरत असुन यात वाहनधारक व इंश्युरंन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांचा सहभागी असल्याची शक्यता आहे. शांताराम अवसरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी