नाशिक : महापालिकेत दुपारपर्यंत विविध ठिकाणी मतदान सुरळीत असताना दुपारनंतर वादाला सुरुवात झाली. प्रभाग १३ आणि १४ मध्ये दगडफेकीनंतर सायंकाळी भाजपाच्या कौलावर शंका घेत पुन्हा एकदा इव्हीएम सेटिंगचे आरोप सुरू झाले. महापालिका निवडणुकीसाठी दहा ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाले. सुरुवातीला संमिश्र कौल असले तरी भाजपाने सर्व ठिकाणहूनच आघाडी घेतली होती. दुपारी प्रभाग १३ चा निकाल लागल्यानंतर भाजपा उमेदवाराच्या घरावर आणि प्रभाग १४ च्या निकालांनतर जुन्या नाशकात दगडफेक झाली. त्यानंतर भाजपाचे सलग चार उमेदवार किंवा पॅनल निवडणून येण्याच्या प्रकारामुळे संशय घेतला जाऊ लागला. त्यातच प्रभाग तीनमध्ये विरोधकांचे लक्ष असलेल्या झालेल्या मतदानापेक्षा अधिक मतदान दिसू लागल्याचा काहींनी दावा केला. त्यामुळे अन्य विरोधकांचा बांध फुटला प्रभाग ३० मध्येही मतमोजणी रोखून धरण्यात आली. भाजपाच्या विजयाविषयी मग शंका घेताना इव्हीएम मशीन सेट झाल्याचा आरोप सुरू झाला. काहींनी तर यंत्रातील मेमरी चीप बदलल्याचा संशय व्यक्तकेला. २००९ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेचे तीन आमदार निवडून आले. त्यावेळी तसेच २०१२ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेच्या लाटेत ४० नगरसेवक निवडून आले, तेव्हा अशाच प्रकारे मशीन सेट झाल्याची चर्चा होत होती. विधानसभेतील पराभुतांनी तर निवडणूक आयोग आणि थेट न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेले होते, त्याचीच पुनरावृत्ती आता भाजपाच्या बाबतीत झाली आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा मशीन सेटिंगचे आरोप, सुरळीत निकालानंतर वादंग
By admin | Updated: February 24, 2017 01:19 IST